शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

गच्छाधिपति आए हैं, नई रोशनी लाए हैं....

By admin | Updated: June 5, 2016 23:51 IST

औरंगाबाद : रविवारी सकाळी ६.३० वाजता गच्छाधिपती आचार्य विजय अभयदेवसुरिश्वरजी महाराज यांचे महावीर चौक येथे आगमन झाले आणि उपस्थित जैन बांधवांनी एकच जल्लोष केला...

औरंगाबाद : रविवारी सकाळी ६.३० वाजता गच्छाधिपती आचार्य विजय अभयदेवसुरिश्वरजी महाराज यांचे महावीर चौक येथे आगमन झाले आणि उपस्थित जैन बांधवांनी एकच जल्लोष केला... ‘गच्छाधिपति आए हैं, नई रोशनी लाए हैंै’ असा जयघोष करीत स्वागतयात्रा कर्णपुरा येथील जैन मंदिरात पोहोचली. प्रसंग होता, शहरात ५ ते १८ जूनदरम्यान आयोजित अभय महामहोत्सवाचा. यानिमित्ताने नऊ वर्षांनंतर आचार्य शहरात आले. मोक्षरत्नविजयजी म. सा., साध्वी प्रज्ञाश्रीजी म. सा., साध्वी पद्मरेखाश्रीजी म. सा., साध्वी डॉ.जयदर्शिताश्रीजी म. सा. आदी साधू-साध्वीजींनी शहरात प्रवेश केला. महावीर चौक येथे महावीर स्तंभ येथून स्वागतयात्रेला सुरुवात झाली. स्वागतयात्रा कर्णपुऱ्यातील मुनिसुव्रत जैन मंदिर येथे पोहोचली. संचालन संजय संचेती यांनी केले. यावेळी किशनचंद तनवाणी, अभय महोेत्सव समितीचे अध्यक्ष आ. सुभाष झांबड, महावीर पाटणी, रवी मुगदिया, संपतराज देवडा, जव्हेरचंद डोसी, कनकमल सुराणा, रतिलाल मुगदिया, विजयराज संघवी, शरद शहा व समाजबांधव हजर होते.आज महामांगलिक गुरू रामजन्म शताब्दी वर्षानिमित्त सकल विश्वशांती, मानव जीवन उद्धारासाठी ६ जून रोजी महामांगलिकचे आयोजन करण्यात आले आहे.सकाळी ९.३० वाजता आचार्यश्रींच्या प्रवचनाला सुरुवात होईल. या सोहळ्यासाठी देश-विदेशातून दीड ते दोन हजार भाविक येणार आहेत. कर्णपुरा येथील मैदानात मोठे मंडप उभारण्यात आले आहेत. कर्णपुऱ्यात आज रक्तदान शिबीर गुरू रामजन्म शताब्दी वर्षानिमित्त अभय मांगलिक मंडळ स्थानिक शाखेच्या वतीने ६ जून रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. कर्णपुरा येथे सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत रक्तदान शिबीर घेण्यात येणार आहे, अशी माहिती डॉ. प्रकाश झांबड यांनी दिली.