शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

पीककर्ज वाटपाचा आढावा पालकमंत्री, पालक सचिव घेणार

By admin | Updated: June 24, 2016 01:26 IST

औरंगाबाद : मराठवाड्यात बँकांकडून पीककर्ज वाटपात विलंब होत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. पीककर्ज वाटपाचा आढावा येत्या तीन दिवसांत पालकमंत्री

औरंगाबाद : मराठवाड्यात बँकांकडून पीककर्ज वाटपात विलंब होत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. पीककर्ज वाटपाचा आढावा येत्या तीन दिवसांत पालकमंत्री आणि पालक सचिवांनी तातडीने घ्यावा, अशा सूचना करण्यात आल्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज गुरुवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. ज्या बँका पीककर्ज देण्यात अडचणी आणत असतील तर, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. पालकमंत्री रामदास कदम, दिवाकर रावते, डॉ. दीपक सावंत, पंकजा मुंडे, बबनराव लोणीकर यांच्यासह पालक सचिवांना विभागात जाऊन पीककर्जाचा आढावा घ्यावा लागणार आहे. बँकांना पीककर्ज आणि पीक विम्याची रक्कम देण्यात आली असली तरी चलन तुटवडा असल्यामुळे ती रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर असली तरी त्यांच्या हाती पडलेली नाही. या प्रकरणाची माहिती घेण्यात येईल, असे मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले. मराठवाड्यातील भूजल पातळी घटली आहे, त्यासाठी वॉटर ग्रीडची निर्मिती करण्यात येणार आहे. येत्या ३ महिन्यांत अहवाल प्राप्त होईल. मराठवाड्यातील औद्योगिक विकासासाठी मुंबई ते नागपूर या सुपर हायवेची निर्मिती करण्यात येत असून, येत्या मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब होणार आहे. महाराष्ट्र ग्रामीण बँकेला कर्ज वाटपासाठी सरकारी मदत करण्याची तयारी असल्याचे सध्या तरी दिसत नाही. त्यामुळे या बँकांना देण्यात आलेले पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट राष्ट्रीयीकृत बँकांना वाटून देण्यात आले आहे.