शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी मंत्र्यांच्या गाड्या अडवा

By admin | Updated: April 27, 2016 00:35 IST

औरंगाबाद : देशात केवळ जाती, धर्माचे राजकारण सुरू आहे. विद्यार्थ्यांवर विशिष्ट विचारप्रणाली लादण्याचा प्रयत्न होतो आहे. त्यामुळे आता गप्प बसून चालणार नाही.

औरंगाबाद : देशात केवळ जाती, धर्माचे राजकारण सुरू आहे. विद्यार्थ्यांवर विशिष्ट विचारप्रणाली लादण्याचा प्रयत्न होतो आहे. त्यामुळे आता गप्प बसून चालणार नाही. आक्रमक बना, मराठवाडा दुष्काळाने होरपळून निघतो आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना फी माफी मिळत नसेल तर मंत्र्यांना फिरू देऊ नका, त्यांच्या गाड्या अडवा, असा सल्ला काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी आज नॅशनल स्टुडंटस् युनियन आॅफ इंडिया (एनएसयूआय) च्या मेळाव्यात विद्यार्थ्यांना दिला.शहरातील भानुदासराव चव्हाण सभागृहात आज एनएसयूआयचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. व्यासपीठावर काँग्रेसचे शहराध्यक्ष नामदेवराव पवार, जितेंद्र देहाडे यांच्यासह प्रभाकर मुठ्ठे, सरोज मसलगे, सतीश पितळे, सूरज निकम, सागर साळुंके आदींची उपस्थिती होती. राणे म्हणाले, देशात विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यात विद्यार्थी भरडला जातो आहे. हे सर्व होत असताना देशपातळीवर केवळ दोनच विद्यार्थी संघटना दिसतात. एकीकडे भाजपची एबीव्हीपी आणि दुसरीकडे डाव्या पक्षांची विद्यार्थी संघटना. काँग्रेसची विद्यार्थी आघाडी (एनएसयूआय) यात कुठेही दिसत नाही. ही खेदाची बाब आहे. तुमची भूमिका कन्हैया वठवीत आहे. तुमच्याऐवजी तो मोदींना ठोकतो आहे. आता गप्प बसणे सोडा. वयाप्रमाणे आक्रमकता दाखवा आणि अधिक आक्रमक व्हा. आज मराठवाड्यात भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. परंतु इथल्या विद्यार्थ्यांना फी माफीही मिळत नाही ही गंभीर बाब आहे. या परिस्थितीत विद्यार्थ्यांनी आक्रमक होऊन मंत्र्यांच्या गाड्या अडविल्या पाहिजे, असेही राणे म्हणाले. तत्पूर्वी नामदेवराव पवार यांनीही आपल्या भाषणात केंद्र आणि राज्यातील सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, भाजपचे सरकार कुणासाठी काम करतेय हे कळत नाही. प्रास्ताविक सागर साळुंके यांनी केले. अणेंना सोडणार नाहीराणे यांनी वेगळ्या विदर्भाची मागणी करणाऱ्या श्रीहरी अणेंवरही टीका केली. ते म्हणाले, अणेच्या कानफाटात मारा किंवा किमान शाई तरी फेका, असा निरोप देऊन मी माझे कार्यकर्ते दिल्लीत पाठविले होते. तेथे त्यांनी अणेंच्या अंगावर शाई फेकली. बाकी काही करता आले नाही. आता फिरतोय महाराष्ट्रभर, पण कधी ना कधी माझ्या टप्प्यात येईल तेव्हा सोडणार नाही, असा इशाराही राणे यांनी यावेळी दिला.