उस्मानाबाद : सतत निर्माण होणारी दुष्काळी स्थिती आणि खालावणाऱ्या भूजलपातळीचा प्रश्न यंदाही कायम आहे़ प्रत्येकवर्षी जलपुनर्भरणावर केली जाणारी चर्चा केवळ बैठका आणि कागदावरच असून, त्याचाच परिणाम म्हणून भूम, परंडा, वाशी तालुक्याची भूजलपातळी आजही जवळपास १३ मीटरने खालावलेली आहे़ उर्वरित तालुक्याची परिस्थिेती बिकट असून, सरासरी १० मीटरने भूजलपातळी खालावली आहे़जिल्ह्यात सलग तीन वर्षे दुष्काळ पडला अन् उन्हाळ्यातील गारपिटीमुळे पावसाने ओढ दिल्याचा अंदाज तज्ज्ञांमधून वर्तविला जात आहे़ मराठवाड्याला विशेषत: उस्मानाबाद जिल्ह्याला प्रतीवर्षी अल्पपर्जन्यमानाचा फटका सहन करावा लागत आहे़ याला तोडगा म्हणून पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब जमिनीत जिरविण्यासाठी जलपुर्नभरण ही संकल्पना पुढे आणण्यात आली़ शासकीय, निमशासकीय बैठकांमध्ये या विषयावर केवळ चर्चाच झाल्या़ त्यानंतर केवळ लालफिती कारभार सुरू आहे़ त्यामुळे यंदाही जिल्ह्यावर भीषण दुष्काळाचे सावट निर्माण झाले असून, पडणाऱ्या रिमझिम पाण्याचा थेंबही साठविण्यासाठी कोणी प्रयत्न करत नसल्याचे दुर्दैवी चित्र आहे़ त्यातच भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेच्या वतीने करण्यात आलेल्या पाहणीत जिल्ह्याच्या घटलेल्या भूजलपातळीचा अहवाल आला आहे़ गतवर्षीपेक्षा कमी प्रमाणात भूजलपातळी घटली असली तरी सरासरी १० ते ११ मीटरने घट कायम आहे़रिचार्ज शाफ्टमुळे फायदाभूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेच्या वतीने पाणीपुरवठ्याची विहिर, कुपनलिका, लहान ओढे, नद्यांमध्ये जवळपास २०६ ठिकाणी रिचार्ज शाफ्ट घेण्यात आले आहेत़ परिणामी कळंब तालुक्यातील शिंगोली, उस्मानाबाद तालुक्यातील तावरजखेडा आदी गावांना पाणीटंचाईच्या झळा कमी प्रमाणात बसल्याचे वरिष्ठ भूवैज्ञानिक रेड्डी यांनी सांगितले़गाळ काढल्याने पाणीसाठागतवर्षी शेतकऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने कोरड्या पडलेल्या साठवण तलावातील गाळ उपसून नेला़ शेतकऱ्यांच्या या प्रयत्नांमुळे अनेक वर्षांपासून गाळाने भरलेल्या प्रकल्पाच्या पाणीसाठवण क्षमतेत वाढ झाली़ परिणामती गतवर्षीच्या अल्पप्रमाणात झालेल्या पावसातही साचलेले पाणी आजवर जिल्हावासियांना शेतीसह पिण्यासाठी उपलब्ध झाले़सर्वसामान्यांचा पुढाकार आवश्यकजिल्ह्यात सातत्याने कमी प्रमाणात पडणारा पाऊस आणि केवळ उन्हाळाच नव्हे तर वर्षातील बाराही महिने जिल्ह्यात सुरू राहणारे टँकर, अधिग्रहण पाहता जलपुनर्भरण ही जिल्ह्यासाठी काळाची गरज बनली आहे़ त्यामुळे पावसाचा प्रत्येक थेंब मुरविण्यासाठी सर्वसामान्यांनी पुढाकार घेवून स्वत:च्या घरावरच जलपुनर्भरण यंत्रणा बसविण्याची गरज आहे़जिल्ह्याची भूजलपातळी सरासरी १० ते ११ मीटरने घटलेली आहे़ यात उस्मानाबाद तालुक्याची १०़३, तुळजापूर १०़३, उमरगा ११़७, लोहारा ९़९, कळंब ९़९, भूम, परंडा व वाशी तालुक्यांची १२़४ मीटरने भूजलपातळी घटली आहे़ गतवर्षी सर्वाधिक वाशी तालुक्याची जवळपास १५ मीटरने भूजलपातळी घटली होती़ सद्यस्थितीत हलक्या स्वरूपाचा पाऊस झाल्याने व या भागात काही प्रमाणात जलसंधारणाच्या कामामुळे भूजलपातळी वाढली आहे़उस्मानाबाद : पावसाळा सुरू होऊन तब्बल दोन महिन्यांचा कालावधी उलटला तरी जिल्हावासियांची मोठ्या पावसाची प्रतीक्षा अद्याप कायम आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा आतापर्यंत केवळ निमा पाऊस झाल्यामुळे बहुतांश तलाव कोरडे पडले असून, उपलब्ध असलेला थोडाफार पाणीसाठाही आता संपण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे शेती पिकाबरोबरच पिण्याचे पाणी व जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्नही जिल्ह्यात गंभीर स्वरूप धारण करीत आहे.यंदा मार्च, एप्रिल महिन्यात झालेल्या गारपीट, अवकाळी पाऊस व वादळामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला. त्यातच पावसानेही बराच काळ ओढ दिल्याने पेरण्या लांबल्या. उशिराने झालेल्या थोड्याफार पावसाने शेतकऱ्यांनी पेरणी केली. परंतु, अनेक ठिकाणी सोयाबीन न उगवल्याने शेतकऱ्यावर पुन्हा नवे संकट कोसळले. शिवाय पेरण्या झाल्यानंतर पुन्हा पावसाने उघडीप दिली. त्यामुळे थोड्याफार प्रमाणात जमिनीच्या वर आलेली पिकेही माना टाकू लागली आहेत. शिवाय ढगाळ वातावरणामुळे काही ठिकाणी पिकांवर रोगाचा प्रादुर्भावही दिसून येत आहे. जिल्ह्यात गतवर्षी १ जून ते ८ आॅगस्ट या कालावधीत ३५२.९ मिमी पावसाची नोंद झाली होती. परंतु, यंदा आतापर्यंत केवळ १७०.१ मिमी पावसाची नोंद झाली असून, याची टक्केवारी २२.२ इतकी आहे. म्हणजेच, गतवर्षीच्या तुलनेत आतापर्यंत केवळ निम्मा पाऊस झाल्याचे यावरून दिसून येते. परिणामी जिल्ह्याच्या अनेक भागात सध्या टंचाईचे तीव्र संकट दिसून येत आहे. आतापर्यंत उस्मानाबाद तालुक्यात १६८.९, तुळजापूर १५७.२, उमरगा १५८.२, लोहारा १७४, कळंब १७७, भूम १७४, वाशी २२३ तर परंडा तालुक्यात १२८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्याची वार्षिक सरासरी ७६७.५ मिमी इतकी असून, त्या तुलनेत आतापर्यंत झालेला हा पाऊस केवळ २२.२ टक्के इतका आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत मोठा पाऊस नाही झाल्यास जिल्ह्यात पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा आदी प्रश्न गंभीर स्वरूप धारण करणार आहेत.
भूजल पातळी खालावलेलीच !
By admin | Updated: August 9, 2014 00:35 IST