लातूर : साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध संस्था, संघटनांच्या वतीने साठे चौकातील अण्णा भाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास शनिवारी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले़ यावेळी अभिवादनाला कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती़ सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने अण्णा भाऊ साठे चौकात अभिवादन करण्यात आले़ उपमहापौर कैलास कांबळे, जयंती समितीचे सचिव अशोक देडे, मनपातील गटनेते सुनिल बसपूरे, हरिदास मगर, अशोक मगर, नगरसेविका केशरताई महापूरे, जी़एग़ायकवाड, माणिक पवार, दत्ता मस्के, विजयालक्ष्मी कांबळे, आनंद वैरागे, प्रकाश पुंड, नारायण कांबळे, डॉ़ शिवाजी जवळगेकर, गोविंद शिंदे यांची उपस्थिती होती़ आवळे युवा मंचच्या वतीने साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले़ दलित मित्र पुरस्कार प्राप्त अॅड़ आऱएस़मोरे, माजी नगरसेवक प्रकाश पुंड, कृषी सहाय्यक संघटनेचे संतराम कसबे, शाम चव्हाण, बिटू गादेकर, पिराजी साठे, रमेश रचाळ, शाम वाघमारे, भालचंद्र काजळे, के़आऱ सूर्यवंशी, बापू मगर आदींची उपस्थिती होती़ जनहित संघर्ष समितीच्या वतीनेही अभिवादन करण्यात आले़ माजी नगरसेवक संतोष सूर्यवंशी, अमोल लांडगे यांनी अण्णा भाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन केले़ अण्णा भाऊ साठे सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने शनिवारी सकाळी १० वाजता साठे चौकातील अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले़
अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन
By admin | Updated: July 19, 2015 00:59 IST