शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
3
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
4
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
5
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
6
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
7
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
8
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
9
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
10
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
11
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
12
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
13
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
14
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
15
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
16
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
17
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
18
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
19
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
20
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
Daily Top 2Weekly Top 5

एअर अ‍ॅम्ब्युलन्ससाठी ग्रीन सिग्नल

By admin | Updated: June 26, 2016 00:40 IST

औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून एअर अ‍ॅम्ब्युलन्सची सेवा सुरू करण्यासाठी अखेर ग्रीन सिग्नल मिळाला आहे.

औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून एअर अ‍ॅम्ब्युलन्सची सेवा सुरू करण्यासाठी अखेर ग्रीन सिग्नल मिळाला आहे. ही सेवा सुरू करणाऱ्या कंपनीला एअर अ‍ॅम्ब्युलन्सच्या पार्किं गसाठी मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच विमानतळावरून एअर अ‍ॅम्ब्युलन्सचे उड्डाण होणार आहे. अवयव प्रत्यारोपणासारख्या महत्त्वाच्या क्षणी थेट औरंगाबादेतून २४ तास एअर अ‍ॅम्ब्युलन्सची सेवा उपलब्ध होईल.जानेवारीमध्ये मराठवाड्यातील पहिल्याच अवयवदानात केवळ हवाई सेवेअभावी हृदय चेन्नईला पोहोचू न शकल्याची घटना घडली. त्यामुळे या घटनेनंतर एअर अ‍ॅम्ब्युलन्सची सेवा किती महत्त्वाची आहे, हे समोर आले. एअर अ‍ॅम्ब्युलन्सअभावी गंभीर आजारी, जखमी रुग्ण आणि अवयव प्रत्यारोपणासाठी संबंधित अवयव अन्य शहरांमध्ये नेईपर्यंत वेळ उलटून जातो. त्यामुळे ही सेवा सुरू करण्यासाठी आवश्यक त्या प्रक्रियांना वेग देण्यात आला होता. एअर अ‍ॅम्ब्युलन्सची सेवा सुरू करण्यासाठी मुंबई येथील मॅब एव्हिएशन कंपनीकडून प्रतिसाद देण्यात आला. या कंपनीच्या एकापथकाने जानेवारीत विमानतळाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन ही सेवा सुरू करण्यासाठी प्रस्ताव दिला. हा प्रस्ताव मंजुरीसाठी विमानतळ प्राधिकरणाच्या वरिष्ठ कार्यालयास पाठविण्यात आला. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून प्रस्तावाच्या मंजुरीची प्रतीक्षा केली जात होती. अखेर वरिष्ठ कार्यालयाकडून एअर अ‍ॅम्ब्युलन्सच्या पार्किंगसाठी परवानगी देण्यात आली. त्यासंदर्भात कंपनीला पत्रही प्राप्त झाले आहे. त्यामुळे लवकरात लवकर ही सेवा सुरू करण्यासाठी कंपनीकडून प्रयत्न सुरू झाले आहेत.