शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
4
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
5
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
6
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
7
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
8
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
9
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
10
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
11
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
12
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
13
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
14
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
15
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
16
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
17
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
18
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
19
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
20
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
Daily Top 2Weekly Top 5

वृक्ष लागवड ठरले जनावरांसाठी कुरण

By admin | Updated: July 15, 2016 00:54 IST

विष्णू गायकवाड , गढी दुष्काळावर मात करण्यासाठी राज्य शासनाने वृक्ष लागवडीचे ध्येय समोर ठेवून जिल्ह्यासह प्रत्येक तालुक्यातील शासकीय विभागाने झाडे लावण्याच्या सक्त सूचना दिल्या

विष्णू गायकवाड , गढीदुष्काळावर मात करण्यासाठी राज्य शासनाने वृक्ष लागवडीचे ध्येय समोर ठेवून जिल्ह्यासह प्रत्येक तालुक्यातील शासकीय विभागाने झाडे लावण्याच्या सक्त सूचना दिल्या. त्यानुसार १ जुलै रोजी मोठ्या प्रमाणात तालुकाभरात रोपांची लागवड झाली. मात्र, लावण्यात आलेल्या रोपांच्या संवर्धनाची जबाबदारी कोणी घेतली नाही. त्यामुळे ही लहान रोपटे जनावरांचा चारा ठरत आहे. एका अर्थाने या योजनेचा बोजवारा उडाला आहे.वनयुक्त शिवार योजना सुरू होण्यापूर्वी शासकीय पातळीवर मोठा गाजावाजा करण्यात आला. प्रत्येक शासकीय कार्यालयास जिल्हाधिकाऱ्यांनी वृक्ष लागवडीचे टार्गेट दिले गेले. १ ते ७ जुलै या कालावधीत वनयुक्त शिवार योजनेसाठीचा सप्ताह पार पडला. शासकीय कार्यालयांनी उद्दिष्टपूर्ती केली; परंतु मूळ मुद्दा होता तो लावण्यात आलेल्या वृक्ष संवर्धनाचा. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी झाडे लावून सेल्फी काढत ती मुख्य कार्यालयाला पाठविली; परंतु आता अनेक ठिकाणी लावलेली रोपटी गायब झाली आहेत. काही ठिकाणी केवळ रोपट्याच्या काड्या उरल्या. झाडांची पाने शेळ्या-मेंढ्यांनी खाल्ली. त्यामुळे या उपक्रमाचा बोजवारा उडाल्याचे स्पष्ट होत आहे.झाडे लावल्यानंतर त्याची जबाबदारी एखाद्या कार्यालयीन कर्मचाऱ्यावर देणे आवश्यक होते, असे वाटप असले तरी प्रत्यक्षात ते होणे अवघड आहे; कारण शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांची संख्या मुळातच कमी असते. सर्वसामान्यांची कामे अनेक वेळा चकरा मारूनही होत नाहीत. त्यातच कार्यालयीन कर्मचाऱ्यांना लावण्यात आलेल्या वृक्ष संवर्धनाची जबाबदारी देण्यात आली तर कार्यालयीन कामे ढेपाळतील. याशिवाय, झाडांना नियमित पाणी देणेही आवश्यक असते. पाणी दिले नाही तर रोप वाढणार कसे? हाही कळीचा मुद्दा ठरतो. केवळ वृक्ष लागवड करून जबाबदारी पूर्ण करण्यासाठीचा हा देखावा आहे काय, असा प्रश्न यानिमित्त उपस्थित केला जात आहे. लावण्यात आलेल्या झाडांना जनावरांपासून संरक्षण मिळावे यासाठी जाळ्या बसविणे उचित ठरते; परंतु हेही खर्चिक बाब असल्याने प्रत्यक्षात उतरणे अवघड आहे.