बीड : ‘लोकमत’च्या अद्ययावत जिल्हा कार्यालयाचा उद्घाटन समारंभ सोमवारी सकाळी ११.३० वाजता मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. नगर परिषदेचे गट नेते डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या हस्ते फित कापून कार्यालयाचे उद्घाटन झाले. यावेळी अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांची विशेष उपस्थिती होती. संपादक सुधीर महाजन, सरव्यवस्थापक राजीव अग्रवाल यांनी मान्यवरांचे स्वागत केले. डॉ. क्षीरसागर म्हणाले, ‘लोकमत’ने स्पर्धेच्या युगातही आपले वेगळेपण जपले आहे. नेहमी विविध विषय हाताळून सामान्यांशी नाते जपले आहे. ‘लोकमत’कडून जनतेच्या अपेक्षा आहेत, त्या नक्की पूर्ण होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अधीक्षक रेड्डी म्हणाले, ‘लोकमत’ सामान्यांचा आधार आहे. ‘लोकमत’ने दिनदुबळ्यांना नेहमीच आधार दिला आहे. जिल्हा कार्यालय सुविधायुक्त झाल्याने सामान्यांच्या अपेक्षा वाढल्या असल्याचे त्यांनी सांगितले.संपादक सुधीर महाजन यांनी सांगितले की, बीडमध्ये पत्रकारितेची मोठी परंपरा आहे. लोकमत कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमास येथील विविध माध्यमांतील मान्यवरांनी हजेरी लावली.स्पर्धेच्या ठिकाणी स्पर्धा अन् वैयक्तिक संबंध वेगळे हे तत्व आम्ही जपले आहे. ते येथेही पहावयास मिळाल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले. (प्रतिनिधी)
'लोकमत'च्या कार्यालयाचे शानदार उद्घाटन
By admin | Updated: September 2, 2014 01:53 IST