शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

मुस्लिम बांधवांचा भव्य मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 00:56 IST

मुस्लिम समाजाच्या वतीने विविध मागण्यांसाठी मेहाराजूल मशिदीपासून जिल्हा कचेरीवर भव्य मोर्चा काढण्यात आला. म्यानमारमध्ये रोहिंग्या मुस्लिम व हिंदूंवर होणारे अत्याचार तसेच भारतातही अल्पसंख्यांकांवर गोवंशाच्या नावावर होणारे हल्ले व पुरोगामी विचारवंतांवर होणारे हल्ले थांबविण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : मुस्लिम समाजाच्या वतीने विविध मागण्यांसाठी मेहाराजूल मशिदीपासून जिल्हा कचेरीवर भव्य मोर्चा काढण्यात आला. म्यानमारमध्ये रोहिंग्या मुस्लिम व हिंदूंवर होणारे अत्याचार तसेच भारतातही अल्पसंख्यांकांवर गोवंशाच्या नावावर होणारे हल्ले व पुरोगामी विचारवंतांवर होणारे हल्ले थांबविण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.मागील काही दिवसांपासून म्यानमारमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारात रोहिंग्या मुस्लिम व हिंदू या अल्पसंख्यांकांना मारले जात आहे. अत्याचार केले जात आहे. पवित्र धार्मिक स्थळे, शाळाही यात लक्ष्य केल्या जात आहेत. या सर्व बाबी मानवाधिकाराचे हनन करणाºया आहेत. त्यामुळे हे प्रकार थांबले पाहिजे, अशी मागणी जिल्हाधिकाºयांमार्फत राष्ट्रपतींना दिलेल्या निवेदनात केली आहे. मुस्लिम बांधवांनी यानिमित्त बंदही पाळला. म्यानमारप्रमाणेच भारतातही काही मंडळी वातावरण दूषित करीत आहे. त्याचाच परिणाम म्हणून पुरोगामी विचारसरणीच्या नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश आदींच्या हत्या झाल्या आहेत. त्यांचे विचार संपविण्याचा हा प्रयत्न विशिष्ट विचाराच्या लोकांनीच केला आहे. भारतासारख्या धर्मनिरपेक्ष देशात अशा अशोभनिय घटना घडत आहेत. असे प्रकार थांबविण्याची मागणी केली. तसेच मुस्लिम समाजाला १५ टक्के आरक्षण देण्याची मागणीही केली.देण्यात आलेल्या या निवेदनावर मुफ्ती शकीलसाब, जुनेदुर रहेमान मौलाना, शेख साजीद शेख खुर्शिद, स.इस्माईल पप्पू, मोईन शेख खयुम, अतिर्खुरहेमान, अमिरोद्दिन रजवी, मौलाना सम्मी हनिफ तांबोळी, मोईन खान, अ.हकीम बागवान, गौस तांबोली, निसारभाई आदींची नावे आहेत.