शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

धान्य देत नाही, म्हणून रेशन दुकानदारच टाकला बदलून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:04 IST

सुनील घोडके खुलताबाद : शासनाकडून दिले जाणारे स्वस्त धान्य मिळत नसल्यामुळे खुलताबाद शहरातील एक टक्का (१९० जण) रेशनकार्ड धारकांनी ...

सुनील घोडके

खुलताबाद : शासनाकडून दिले जाणारे स्वस्त धान्य मिळत नसल्यामुळे खुलताबाद शहरातील एक टक्का (१९० जण) रेशनकार्ड धारकांनी रेशन दुकानदारच बदलून टाकला आहे. त्यातच मागील दोन-तीन वर्षांपासून तयार झालेल्या नवीन कार्डधारकांना शासकीय यंत्रणेतील त्रुटींमुळे धान्य मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.

खुलताबाद तालुक्यात एकूण ८९ स्वस्त धान्याची दुकाने आहेत. यात बीपीएल कार्डधारक निरंक आहेत. अंत्योदय योजनेचे १,९९१, (केशरी कार्ड) प्राधान्य कुटुंब योजनेचे १८,१०८ कार्डधारक आहेत, तर एपीएलचे २,४६६ कार्डधारक आहेत. सद्यस्थितीत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेतील कार्डधारकांना प्रति सदस्य ५ किलो धान्य मिळते. यात ३ किलो गहू व २ किलो तांदूळ दर महिन्याला प्रतिव्यक्ती दिले जातात. खुलताबाद शहरात जवळपास दहा स्वस्त धान्य दुकाने आहेत. अनेक दुकानदारांकडून धान्य वेळेवर दिले जात नाही किंवा तांत्रिक अडचणी सांगून धान्य दिले जात नसल्याने एक टक्का लोकांनी दुकानदारच बदलला आहे.

---

कनकशीळच्या ३५ जणांना धान्य मिळण्याची प्रतीक्षा

खुलताबाद तालुक्यातील कनकशीळ या गावातील जवळपास ३५ रेशनकार्ड धारकांना गेल्या दोन वर्षांपासून रेशनचे धान्य मिळत नाही. नंदा सुरेश बोडखे, देवराव एकनाथ यादव, विश्वनाथ बाबूराव दांडगे, त्र्यंबक आबळाजी जाधव, लक्ष्मीबाई रामचंद्र दांडेकर यांच्यासह ३५ जणांना धान्य मिळण्याची प्रतीक्षा आहे. त्यांनी गुरुवारी तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांच्याकडे तक्रार केली आहे.

-----

तालुक्यातील एकूण कार्डधारक : २२,५६५

किती जणांनी बदलले दुकानदार : १९०

---

पॉईंट :

१) खुलताबाद तालुक्यात तयार झालेल्या नवीन कार्डधारकांना धान्य मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत.

२) शहरातील दहा दुकानांमधील १९० जणांनी दुकानदार बदलो.

३) खुलताबाद शहर सोडून तालुक्यातील ग्रामीण भागात दुकानदार बदलण्याचे प्रमाण कमी.

४) प्रत्येक गावात एकच दुकानदार असल्याने दुकानदार बदलण्यासाठी पर्याय नसतो.