शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

ग्रा.पं.स्तरावरील कामकाज ठप्प

By admin | Updated: July 11, 2014 01:03 IST

सेनगाव : महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेसाठी ग्रा. पं. स्तरावर स्वतंत्र यंत्रणा निर्माण करावी यासह इतर मागण्यांसाठी ग्रामसेवक संपावर गेल्याने ग्रामीण भागात शेतकरी-ग्रामस्थांची गैैरसोय झाली आहे.

सेनगाव : महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेसाठी ग्रा. पं. स्तरावर स्वतंत्र यंत्रणा निर्माण करावी यासह इतर मागण्यांसाठी ग्रामसेवक संपावर गेल्याने ग्रामीण भागात शेतकरी-ग्रामस्थांची गैैरसोय झाली आहे. ग्रा. पं. स्तरावरील विविध प्रमाणपत्रे मिळत नसल्याने कार्यालयीन कामकाजही ठप्प झाले आहे.रोजगार हमी योजनेसाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करावी, ग्रामसेवक-ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या वेतनातील त्रुटी दूर करावी, कंत्राटी ग्रामसेवकांचा सेवाकाल कंत्राटी शिक्षकांप्रमाणे करावा, वीस ग्रामपंचायतीमागे एक विस्तार अधिकारी पद निर्माण करणे, आदर्श ग्रामसेवकांना दोन आगाऊ वेतनवाढ द्याव्यात, प्रवासभत्ता पगारासोबत तीन हजार करणे, ग्रामसेवकांवरील कामाचा ताण कमी करणे यासह अन्य मागण्यांसाठी ग्रामसेवकांच्या वतीने २ जुलैैपासून काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. मागील आठ दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनामुळे ग्रामपंचायत पातळीवर कामे होत नसल्याने ग्रामस्थांची गैैरसोय झाली आहे. रहिवासी प्रमाणपत्र, जन्म-मृत्यू दाखले, नमुना नं.८, उत्पन्न प्रमाणपत्र यासह विविध प्रमाणपत्रे ग्रामसेवकांअभावी मिळत नसल्याने विद्यार्थी, ग्रामस्थांची अडचण झाली आहे. विद्यार्थ्यांना ग्रामसेवकांच्या आंदोलनाचा मोठा फटका बसला आहे. शैक्षणिक कामकाजासाठी लागणारी प्रमाणपत्रे मिळत नसल्याने आठ दिवसांपासून त्यांना ग्रामपंचायत कार्यालयात खेटे मारावे लागत आहेत. ग्रामसेवकांच्या बेमुदत कामबंद आंदोलनामुळे सर्वांचीच गैरसोय होत असताना प्रशासनाने पर्यायी व्यवस्था केली नसल्याने सर्वसामान्यांना वेठीस धरणाऱ्या यंत्रणेबद्दल संताप व्यक्त केला जात आहे. जिल्हा परिषदेच्या वतीने ग्रामसेवकांना काढण्यात आलेल्या नोटीसाही ग्रामसेवकांनी स्विकारल्या नसल्याने संघटनेचे अध्यक्ष, सचिव यांच्या पत्यावर नोटीसा पाठविण्याची कार्यवाही पंचायत समिती स्तरावर करण्यात आली आहे; परंतु त्याला संघटनेने प्रतिसाद दिला नसल्याने या आंदोलनामुळे ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. (वार्ताहर)ग्रामसेवकांचा संप सुरूचहिंगोली जिल्ह्यात विविध प्रलंबित मागण्यांसाठी २ जुलैैपासून ग्रामसेवक संघटनेच्या वतीने काम बंद आंदोलन सुरू आहे. मागील आठ दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनामुळे ग्रामपंचायत पातळीवरील कामे ठप्प झाली आहेत. ग्रामस्थांची गैैरसोय झाली आहे.रहिवासी प्रमाणपत्र, जन्म-मृत्यू दाखले, नमुना नं.८, उत्पन्न प्रमाणपत्र यासह विविध प्रमाणपत्रे ग्रामसेवकांअभावी मिळत नसल्याने विद्यार्थी, ग्रामस्थांची अडचण झाली आहे.शैक्षणिक कामकाजासाठी लागणारी प्रमाणपत्रे मिळत नसल्याने आठ दिवसांपासून त्यांना ग्रामपंचायत कार्यालयात खेटे मारावे लागत आहेत. प्रशासनाने पर्यायी व्यवस्था केली नसल्याने वेठीस धरणाऱ्या यंत्रणेबद्दल संताप व्यक्त केला जात आहे. जि.प.ने काढलेल्या नोटीसाही ग्रामसेवकांनी स्विकारल्या नाहीत.या आंदोलनामुळे ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.