शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

आबालवृद्धांनी अनुभवला गोविंदांचा थरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 01:18 IST

‘गोविंदा, गोविंदा, गोविंदा’चा उदंड जयघोष, डीजेवरील रिमिक्सची धून अशा जल्लोषपूर्ण वातावरणात गोविंदा पथके जेव्हा थरावर थर रचत मानवी मनोरा तयार करीत होते तेव्हा प्रत्येक जण श्वास रोखून तो थरार अनुभवत होते.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : ‘गोविंदा, गोविंदा, गोविंदा’चा उदंड जयघोष, डीजेवरील रिमिक्सची धून अशा जल्लोषपूर्ण वातावरणात गोविंदा पथके जेव्हा थरावर थर रचत मानवी मनोरा तयार करीत होते तेव्हा प्रत्येक जण श्वास रोखून तो थरार अनुभवत होते. कुठे ६ तर कुठे ७ थर रचण्यात काही गोविंदा पथके यशस्वी झाले. दहीहंडी फोडताच उपस्थित ध्वजारोहण बेधुंद नृत्य करीत आनंदोत्सव साजरा करीत होते.शहरातील ३० पेक्षा अधिक गोविंदा पथकांनी मंगळवारची सायंकाळ गाजविली. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दुसºया दिवशी दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. शहरातील विविध भागांत सुमारे ४५ ठिकाणी लहान-मोठ्या दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. त्यातील प्रमुख कॅनॉट प्लेस, आविष्कार चौक, टीव्ही सेंटर, गुलमंडी, गजानननगर आदी ठिकाणच्या दहीहंडी सर्वांच्या आकर्षण ठरल्या. ५० वर्षांची गोविंदा पथकाची परंपरा असलेल्या जबरे हनुमान मंडळाने जाधवमंडीत ७ थर रचत दहीहंडी फोडून जल्लोष केला. या मंडळाने नंतर शहरातील अनेक दहीहंडी फोडल्या. कॅनॉट प्लेस येथे नगरसेवक प्रमोद राठोड आयोजित स्वाभिमानी दहीहंडी उत्सव पाहण्यासाठी हजारो आबालवृद्धांनी गर्दी केली होती. जागा मिळेल तेथे उभे राहून मानवी मनोरांचा थरार सारेजण अनुभवत होते. या ठिकाणी २७ गोविंदा पथकांनी सलामी दिली. अखेरीस भवानीनगरच्या गोविंदा पथकाने दहीहंडी फोडली. टीव्ही सेंटर चौकात चोहोबाजूने नागरिकांची तुफान गर्दी झाली होती. यामुळे गोविंदा पथकांचा उत्साह आणखी द्विगुणित होत होता. येथे अनेक मंडळांना ५ थरांपर्यंतच मजल मारता आली. अनेक पथके सलामी देऊन पुढील दहीहंडी फोडण्यासाठी जात होते. हर्सूल येथील हरसिद्धी गोविंदा पथक, जय भोले गोविंदा पथक, जबरे हनुमान गोविंदा पथक यांनी सहा थर लावून येथे सलामी दिली. येथे अखेरीस खा. चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते दहीहंडी फोडण्यात आली. आविष्कार कॉलनी चौकातील संस्कृती दहीहंडी महोत्सवातही एकाही पथकाला दहीहंडीपर्यंत पोहोचता आले नाही. येथे रात्री १० वाजता बेगमपुरा येथील राजे संभाजी पथकाने दहीहंडी फोडली. पुंडलिकनगर येथे आ.अतुल सावे यांनी ‘नमो ’ दहीहंडी महोत्सवाचे आयोजन केले होते. येथेही भवानीनगर गोविंदा पथकाने बाजी मारत दहीहंडी फोडली. या दहीहंडी सोहळ्यात सर्वांचे आकर्षण राहिली ती अभिनेत्री सुरुची आडारकर तसेच गायक अरविंद्र सिंग.सिडको एन-५ येथील बजरंग चौकातही दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले होते. याठिकाणी जयभद्रा गोविंदा पथकाने बाजी मारत दहीहंडी फोडून जल्लोष केला. याशिवाय सिडकोतील अनेक कॉलन्यांमध्ये बच्चे कंपनीने दहीहंडीचे आयोजन केले होते. या दहीहंडी महोत्सवाचा स्थानिक रहिवाशांनी आनंद लुटला.