लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शेतकºयांच्या पीकविम्या संदर्भात राज्य शासनाने चार दिवसांत चार आदेश काढले़ प्रशासनातील अधिकाºयांच्या म्हणण्यानुसार सातत्याने निर्णय बदलले़ त्यामुळे सत्ताधाºयांना प्रशासन चालविता येईनासे झाले आहे़ त्याचा शेतकºयांना नाहक त्रास सहन करावा लागला असल्याची टीका राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा़ अशोकराव चव्हाण यांनी बुधवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना केली़काँग्रेसचे उपाध्यक्ष खा़ राहुल गांधी ८ सप्टेंबर रोजी परभणी दौºयावर येत आहेत़ यानिमित्त होणाºया कार्यक्रमाची माहिती देण्याकरीता शहरातील मास्टर कॅफे येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना प्रदेशाध्यक्ष खा़ अशोकराव चव्हाण म्हणाले की, शेतकºयांच्या पीकविम्या संदर्भात राज्य शासनाने चार दिवसांत चार वेगवेगळे आदेश काढले़ यामुळे शेतकºयांमध्ये संभ्रम निर्माण झाला़ मुळातच या संदर्भातील प्रक्रिया व्यवस्थित राबविली गेली नाही़ अधिकाºयांच्या म्हणण्यानुसार सत्ताधाºयांनी असे निर्णय घेतले़ त्यामुळे त्यांना प्रशासन कसे चालवायचे हेच कळत नाही, असेही ते म्हणाले़ राज्य शासनाने जाहीर केलेली कर्जमाफी फसवी असून, ३४ हजार कोटींच्या कर्जमाफीची घोषणा केली गेली़ प्रत्यक्षात ५ हजार कोटींपेक्षा कमी कर्जमाफी झाली आहे़ त्यामुळे राज्य सरकारची ही आकडेवारी फसवी आहे़ शेतकºयांची संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे ही काँग्रेसची पूर्वीपासून मागणी होती व आजही ती कायम आहे़ कर्जमाफीचे अर्ज भरतानाही अनेक अटी घातल्या़ त्यामध्ये जातीचा उल्लेख केला गेला़ राज्य शासन जात पाहून शेतकºयांना कर्जमाफी देणार आहे की काय? असाही सवाल यानिमित्ताने उपस्थित झाल्याचे ते म्हणाले़ परभणी वगळता मराठवाड्यातील सात जिल्ह्यातील मागच्या वेळी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका व इतर स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडणूक लढविलेल्या उमेदवारांचा व काँग्रेसच्या पदाधिकाºयांचा मेळावा ८ रोजी सकाळी ९़३० वाजता नांदेड येथे होणार असून, दुपारी १़३० वाजता परभणी येथे संघर्ष सभेचे आयोजन करण्यात आले आहे़ काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी हे यावेळी मार्गदर्शन करणार आहेत़ शेतकºयांची संपूर्ण कर्जमाफी, पीकविमा, जीएसटी, नोटाबंदीनंतर रिझर्व्ह बँकेने दिलेला अहवाल, प्रदेश काँग्रेस कमिटीने सर्वसामान्यांच्या हितासाठी घेतलेली भूमिका या सर्व बाबींवर खा़राहुल गांधी हे मार्गदर्शन करणार आहेत, असेही ते म्हणाले़ यावेळी ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचा निषेध करताना त्यांनी दाभोलकर, पानसरे यांच्या हत्येच्या तपासाकडे राज्य शासन जाणूनबुजून दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप केला़ यावेळी माजी खा़ तुकाराम रेंगे, सरचिटणीस विनायकराव देशमुख, श्याम उमाळकर, जिल्हाध्यक्ष सुरेश वरपूडकर, माजी आ़ सुरेश देशमुख, सत्संग मुंढे आदींची उपस्थिती होती़
सत्ताधाºयांना प्रशासन चालविता येईना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 00:33 IST