शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय तंत्रनिकेतनबाबत पुनर्विचार करणार - वायकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2016 00:30 IST

जालना : जालना येथील तंत्रनिकेतन बंद करण्याचा निर्णय झाला असला तरी या निर्णयावर पुनर्विचार करणार असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी गुरुवारी येथे सांगितले.

जालना : जालना येथील तंत्रनिकेतन बंद करण्याचा निर्णय झाला असला तरी या निर्णयावर पुनर्विचार करणार असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी गुरुवारी येथे सांगितले. जालना शहराजवळील तंत्रनिकेतनमध्ये आयोजित बैठकीत ते बोलत होते. अभियांत्रिकी महाविद्यालय सुरु करण्याचा निर्णय औरंगाबादच्या मंत्रिमंडळ बैठकीत झाला आहे. मात्र, अभियांत्रिकी महाविद्यालय येथे कायम राहिले पाहिजे यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे वायकर म्हणाले.जालना तंत्रिनकेतनमधील असुविधांबाबत विधान परिषद सदस्य सतीश चव्हाण यांनी अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला होता. विद्यालयाची पाहणी करण्यासाठी वायकर गुरुवारी सकाळीच येथे पोहोचले. यावेळी आ. सतीश चव्हाण यांचीही उपस्थिती होती. याप्रसंगी वायकर यांनी संपूर्ण परिसराची तसेच येथील वसतिगृहाची पाहणी केली. विद्यार्थ्यांनीही भेडसावणाऱ्या समस्या मांडल्या. तर प्रशासनाने पाण्याचा प्रश्न सोडविण्याची मागणी केली. त्यावर राज्यमंत्री खोतकर यांनीही डीपीसी निधीतून तरतूद करुन पाणीप्रश्न सोडविण्यासाठी प्रस्ताव देणार असल्याचे सांगितले. यासंदर्भात तंत्रनिकेतनच्या प्रशासनाने प्रस्ताव द्यावा आपण या सर्व समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करु , असे मंत्री वायकर म्हणाले. सहायक संचालक महेश शिवणकर, प्राचार्य एस. आर. नवले, बांधकाम विभागाचे अभियंता बेलापट्टे उपस्थित होते. (प्रतिनिधी)