शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गातील सरकारी जमीन संपादनाचा तिढा कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 15:19 IST

औरंगाबाद तालुक्यातून जाणाऱ्या या महामार्गासाठी २१७ हेक्टर खाजगी भूसंपादन झाले आहे. तर गांधेली आणि देवळाई परिसरात असलेल्या वन विभागाच्या ११.७८ हेक्टर जमिनीचे भूसंपादन रखडले आहे.

ठळक मुद्दे वन विभागासह वाल्मीचे भूसंपादन रखडलेखाजगी जमिनी मात्र संपादित औरंगाबाद शहराजवळील तीन ठिकाणचे भूसंपादन रखडल्याने काम वेळेवर पूर्ण होण्यात अडचण

- राजेश भिसे औरंगाबाद : विकासाचे प्रकल्प वा महामार्ग बांधणीसाठी जमीन संपादन महत्त्वाचे असते. यासाठी सरकारी जमिनी तात्काळ मिळतात. पण खाजगी भूसंपादन करताना अनंत अडचणी येतात. सोलापूर- धुळे हा राष्ट्रीय महामार्ग अपवाद ठरला असून, यात खाजगी जमीन संपादित झाली आहे. तर केवळ सरकारी वन विभाग व वॉटर अ‍ॅण्ड लॅण्ड मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट (वाल्मी) चे भूसंपादन रखडले आहे. परिणामी या महामार्गाचे काम संथगतीने सुरू आहे.

धुळे- सोलापूर हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २११ औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड, वेरूळ, दौलताबाद, वाल्मी, देवळाई परिसर, गांधेली परिसर मार्गे बीडकडे जात आहे. औरंगाबाद तालुक्यातून जाणाऱ्या या महामार्गासाठी २१७ हेक्टर खाजगी भूसंपादन झाले आहे. तर गांधेली आणि देवळाई परिसरात असलेल्या वन विभागाच्या ११.७८ हेक्टर जमिनीचे भूसंपादन रखडले आहे. वॉटर अ‍ॅण्ड लॅण्ड मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट अर्थात वाल्मी या संस्थेकडूनही ८.५ हेक्टर भूसंपादन अद्याप झालेले नाही. परिणामी परिसरातील इतर खाजगी जमिनीचे सपाटीकरण व इतर कामे संथगतीने सुरू असल्याचे दिसून आले. गांधेली परिसरात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने महामार्ग बांधणीसाठीच्या साहित्य निर्मितीचा प्रकल्प सुरू करण्यास कंत्राटदारास परवानगी दिली आहे.

यात सिमेंट पाईपसह खडी तयार केली जात आहे. ‘वाल्मी’ आणि वन विभागाच्या जमिनींवर राष्ट्रीय महामार्गाचे मार्किंग करण्यात आले आहे. भूसंपादन होत नाही तोपर्यंत रस्त्याच्या कामाला गती येणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले. सोलापूर-धुळे या राष्ट्रीय मार्गासाठी खाजगी जमीन संपादन करताना जिल्हा प्रशासनाला कोणतीही अडचण आली नाही. तर या महामार्गाच्या बांधणीत मुख्य अडचण ही सरकारी जमीन संपादनाची ठरत आहे.वर्षभरापासून हा तिढा सुटू शकला नसल्याने जिल्हा आणि राज्य शासनासाठी भूसंपादन डोकेदुखी ठरत आहे. तर खाजगी जमीन संपादित करताना राज्य आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या मावेजाचा कुठलाही आक्षेप नोंदविण्यात आला नसल्याचे उपविभागीय अधिकारी ज्ञानोबा बाणापुरे यांनी सांगितले. 

रस्ते विकासात प्रशासकीय अनास्थारस्ते हे त्या-त्या गावच्या विकासात प्रमुख भूमिका निभावतात. सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गासाठी खाजगी जमीन संपादित होते. पण सरकारी जमीन संपादित होण्यास विलंब होत असल्याने प्रशासकीय पातळीवर अनास्था असल्याचे हे निदर्शक आहे. 

लवकरच तिढा सुटेल जिल्हाधिकाऱ्यांनी वन विभागाला शम्मी गेवराई भागात पर्यायी ११.७८ हेक्टर जमीन देऊ केली आहे. हा प्रश्न निकाली निघण्याची शक्यता आहे. दोन दिवसांत याचे प्रमाणपत्र आॅनलाईन अपलोड केले जाईल. वाल्मीच्या जमीन संपादनासाठी मंत्रालयस्तरावर पाठपुरावा सुरू आहे. तीन महिन्यांत हा तिढा सुटण्याची शक्यता आहे. - अजय गाडेकर, प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण

मावेजाचा ‘वाल्मी’चा प्रयत्न या राष्ट्रीय महामार्गासाठी वाल्मीची ८.५ हेक्टर जमिनीची गरज आहे. ही जमीन शासनाची असल्याने मावेजा देण्याची गरज नसल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. तर जमीन घेणार असाल तर मावेजा द्यावाच लागेल, अशी जलसंधारण विभागाची भूमिका असल्याने तिढा अद्याप सुटू शकलेला नाही. - डॉ. ज्ञानोबा बाणापुरे, उपविभागीय अधिकारी, औरंगाबाद.

महत्वाचे : - धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २११- औरंगाबाद शहराजवळील तीन ठिकाणचे भूसंपादन रखडल्याने काम वेळेवर पूर्ण होण्यात अडचण- महामार्गासाठी २१७ हेक्टर खाजगी भूसंपादन- देवळाई परिसरात असलेल्या वन विभागाच्या ११.७८ हेक्टर जमिनीचे भूसंपादन रखडले - वाल्मी या संस्थेकडूनही ८.५ हेक्टर भूसंपादन नाही 

टॅग्स :highwayमहामार्गAurangabadऔरंगाबादpwdसार्वजनिक बांधकाम विभाग