शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

ऐतिहासिक दसरा महोत्सवाला सरकारीकरणाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 00:53 IST

येथील ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या दसरा महोत्सवाचे आता पूर्णपणे शासकीयीकरण होत असल्याने स्थानिकांनी त्याकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपलेल्या या महोत्सवाची कोणतीच तयारी दिसून येत नाही. परिस्थिती अशीच राहिली तर यंदा ‘फ्लॉप शो’ची प्रचिती येण्याची शक्यता आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : येथील ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या दसरा महोत्सवाचे आता पूर्णपणे शासकीयीकरण होत असल्याने स्थानिकांनी त्याकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपलेल्या या महोत्सवाची कोणतीच तयारी दिसून येत नाही. परिस्थिती अशीच राहिली तर यंदा ‘फ्लॉप शो’ची प्रचिती येण्याची शक्यता आहे.हिंगोलीच्या ऐतिहासिक दसरा महोत्सवात खर्चावरून स्थानिकांत होत असलेल्या वादामुळे मागील तीन वर्षांपासून प्रशासनाने सूत्रे हाती घेतली. तेव्हापासून या शहराच्या या वैभवशाली परंपरेला जणू गालबोटच लागले. खर्चावरून होणाºया कुरबुरी अजून संपल्या नाहीत. प्रथम तत्कालीन अप्पर जिल्हाधिकारी राम गगराणी यांच्या हाती सूत्रे आली आणि त्यांनी या महोत्सवाचे शासकीयीकरण करण्याची कोणतीच कसर सोडली नाही. आपल्याला काय करायचे? या भूमिकेतून लोकप्रतिनिधी, व्यापारी व इतरांनीही यातून अंग काढून घेतले. यात महोत्सवातील काही परंपरांना छेद दिला तरीही लोकांनी निमूटपणे सहन केले. परंतु आपल्या कामाचा व्याप सांभाळत या महोत्सवात लक्ष घालणे अधिकाºयांना जड जात होते. मग त्यातही प्रशासनाचा फायदा पाहिला जावू लागला. महोत्सवातील हिशेबात खरेच काही गैर होत असेल तर त्यात कोणाचीही गय होता कामा नये. मात्र प्रशासनाचे सूत्रे हाती घेतली तर त्यावर नियंत्रण आणनेही त्यांचीच जबाबदारी आहे. दहा दिवसांसाठी सेवाभावीवृत्तीने एखादा चार्टड अकाउंटंटही हा कारभार पाहण्यास तयार होईल. मात्र विश्वास आणि योग्य लेखासंहितेचा अवलंब आवश्यक आहे. एकीकडे महोत्सवातून जमलेल्या रक्कमेवर शासकीय कर्मचाºयांच्या स्पर्धा व इतर बाबी प्रशासन करीत असताना स्थानिकांना याबद्दल विचारण्याचाही अधिकार नसल्याच्या अविर्भावात वागत असेल आणि त्यामुळे या परंपरेला मारक बाबींचा शिरकाव होत असेल तर हे स्थानिकांचेच अपशय म्हणावे लागेल.यंदाच्या दसरा महोत्सवातील प्रदर्शनीची अजून कोणतीच तयारी नाही. मुख्य आकर्षण असलेल्या मोठ्या झुल्यांचाही पत्ता नाही. छोट्या झुल्यांची तेवढी बोली लिलावात झाली आहे. दसरा महोत्सवाचा फ्लॉप शो ठरणार अशा गावगप्पाही रंगत आहेत. मात्र लोकप्रतिनिधींनीही स्थानिकांना विश्वासात घेत नेमके कुठे पाणी मुरतेय? याचा शोध घेणे महत्त्वाचे वाटत नाही. या महोत्सवाचे धार्मिक महत्त्व अबाधित ठेवून लोकरंजनही तेवढीच गरजेची बाब आहे. मात्र त्यासाठी प्रयत्नच कोणी करणार नसेल तर गावगप्पा प्रत्यक्षात उतरणे अपरिहार्यच आहे.