शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
4
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
5
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
7
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
8
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
9
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
10
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
11
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
12
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
13
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
14
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
15
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
16
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
17
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
18
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
19
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
20
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
Daily Top 2Weekly Top 5

आयएसओ मिळाले; आता जनतेचा विश्वास जिंका !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 01:00 IST

ठाण्यांना आयएसओ मिळाले ही अभिनंदनीय बाब आहे. केवळ ठाण्याची इमारत सुसज्ज, परिसर चकाचक झाला म्हणजे काम संपले असे नाही,

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : ठाण्यांना आयएसओ मिळाले ही अभिनंदनीय बाब आहे. केवळ ठाण्याची इमारत सुसज्ज, परिसर चकाचक झाला म्हणजे काम संपले असे नाही, तर हा मान टिकवून ठेवण्याबरोबरच सर्वसामान्यांना सेवा देण्याची खरा कस लागणार आहे. त्यामुळे सर्वांनी प्रामाणिक काम करून जनतेचा विश्वास जिंका, असा कानमंत्र औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मिलींद भारंबे यांनी आयएसओ मानांकन प्राप्त ठाणेप्रमुखांना दिला.बीड जिल्हा पोलीस दलातील १२ पोलीस ठाण्यांना आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे. याचे प्रमाणपत्र वितरण सोहळ्याबरोबरच ठाणेप्रमुखांचा कौतूक सोहळा बुधवारी यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात पार पडला. कार्यक्रमाला पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, अजित बोºहाडे, पोलीस उपअधीक्षक मंदार नाईक, अभिजित पाटील, सुधीर खिरडकर, डॉ.विशाल आनंद, अर्जुन भोसले, परिविक्षाधिन पोलीस उपअधीक्षक अनुराधा गुरव, पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, नायब तहसीलदार दळवी आदींची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. पोलीस दलात अनेक महिन्यानंतर एवढा मोठा कार्यक्रम झाला.पुढे बोलताना भारंबे म्हणाले, एकदाच एवढे मोठे प्रमाणपत्र पटकावणे सोपे नाही. परंतु ही किमया बीड जिल्हा पोलीस दलाने करून दाखविली हे कौतुकास्पद आहे. मी सांगलीला असताना २२ पोलीस ठाणी व सहा पोलीस उपविभागीय कार्यालये एकाचवेळी आयएसओ केली होती. आज पुन्हा तो सोनेरी दिवस बीड जिल्ह्यात उजाडल्याचे सांगत त्यांनी जिल्हा पोलीस दलाची पाठ थोपटली. ठाण्यात येणाºया सर्वसामान्य जनतेला दर्जेदार आणि वेळेच्या आत सेवा द्या, त्यांच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण करा. महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, मागासवर्गीय, अल्पसंख्याक, लहान मुले अशा वेगवेगळ्या स्तरातील, घटकातील लोक ठाण्यात आले की, त्यांना पहिला आधार द्या, तरच ते आपले म्हणने व्यवस्थित मांडू शकतील. आयएसओ मानांकन प्राप्त केले म्हणजे किल्ला सर केला, असे नाही, तर ही चांगली सेवा देण्याची पहिली पायरी आहे, असे समजा. ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ हे ब्रीदवाक्य डोळ्यासमोर ठेवून काम करा, असा सल्लाही देत आपण पोलीस दलात काम करीत असल्याची जाणीव ठेवण्याबद्दल कानमंत्र दिला.सूत्रसंचालन प्रशांत जोशी यांनी केले. बीड ग्रामीण पोलिसांच्या वतीने दारुबंदी व एक गाव एक गणपती संदर्भातील जनजागृतीविषयक भित्तीपत्रकाचे विमोचन भारंबे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पोलीस उप अधीक्षक सुधीर खिरडकर, अनुराधा गुरव, सपोनि शीतलकुमार बल्लाळ उपस्थित होते. यावेळी पोलीस अधिकारी, कर्मचारी, पोलीस पाटील, पोलीस मित्र, नागरिक, महिला यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.उत्साह कौतुकास्पदप्रत्येक ठाण्यातील अधिकारी, कर्मचाºयांमधील उत्साह खरोखरच कौतुकास्पद आहे. टीमवर्कनेच यशाचे शिखर पार करता आले, असे सांगत भारंबे यांनी ठाणेप्रमुखांचा आणखी मनोबल वाढवित त्यांना पाठबळ दिले.कौतुक अन् गुणगौरव सोहळादहावी, बारावीसह इतर क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थी, उत्कृष्ट पोलीस पाटील, पोलीस मित्र, ठाणे प्रमुख, ज्येष्ठ नागरिक यांच्यासह सर्व ठाणेप्रमुखांचा गौरव व कौतुक सोहळा उत्साहात पार पडला.