मंठा : गोर सेनेच्या नेतृत्वाखाली बंजारा समाजातील महिला-पुरूषांनी पारंपरिक वेशभुषा परिधान करून समाजाच्या २० प्रमुख मागण्या मंजूर करण्यासाठी सोमवारी तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढून नायब तहसीलदारांना या मागण्यांचे निवेदन दिले. भारत स्वातंत्र्य होऊ न ६९ वर्षे पूर्ण झाली. महाराष्ट्र राज्याची निमिती होऊन ५६ वर्षे पूर्ण झालेली असताना बंजारा समाजाचा अपेक्षित विकास झालेल्या नाही. त्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. परंतु, महाराष्ट्र सरकारने कायम बंजारा समाजाक डे दुर्लक्ष के ले आहे. दिलेल्या निवेदनात बंजारा समाजाचा २० प्रमुख मागण्या मंजूर क रण्यासाठी गोर सेनेच्या वतीने २ मे रोजी महिला-पुरूषांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून तहसीलवर धडक मोर्चा काढला. या मोर्चात बंजारा समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.यावेळी मागण्याचे निवेदन नायब तहसीलदार ताडेवाड यांना दिले. यावेळी गोर सेना तालुक ाध्यक्ष भीमराव राठोड, उपाध्यक्ष सुभाष चव्हाण व विजय चव्हाण, सचिव अरूण राठोड, सुखदेव राठोड व संदीप जाधव, छत्रपती राठोड, विलास राठोड, बंडु राठोड, ज्ञानेश्वर राठोड, गोविंद राठोड, अंकु श चव्हाण व बंडू चव्हाण आदींची उपस्थिती होती.
गोरसेनेचा तहसीलवर मोर्चा
By admin | Updated: May 3, 2016 01:03 IST