शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

बँकेच्या लॉकरमधून सोने गायब

By admin | Updated: July 2, 2014 00:19 IST

कडा: आष्टी तालुक्यातील कडा येथील स्टेट बँक आॅफ हैद्राबाद शाखेतील एका महिलेच्या लॉकरची बनावट चावी तयार करुन तत्कालिन शाखा व्यवस्थापक व इतर एका व्यक्तीन लॉकर उघडले.

कडा: आष्टी तालुक्यातील कडा येथील स्टेट बँक आॅफ हैद्राबाद शाखेतील एका महिलेच्या लॉकरची बनावट चावी तयार करुन तत्कालिन शाखा व्यवस्थापक व इतर एका व्यक्तीन लॉकर उघडले. त्यातील पन्नास तोळे सोन्याचे दागिणे व इतर महत्वाची कागदपत्रे गायब झाल्याच्या आरोपावरुन बँकेच्या तत्कालीन शाखा व्यवस्थापक व इतर एका विरुद्ध आष्टी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. आष्टी पोलिस ठाण्यात सुमनबाई तुकाराम नलावडे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, कडा येथील स्टेट बँक आॅफ हैद्राबादच्या शाखेत खाते आहे. तसेच बँकेत ए-४२ क्रमांकाचे लॉकर आहे. या लॉकरची चावी २००३ सालाच्या कालावधीत हरवली होती. त्यामुळे नलावडे यांनी याची माहिती तत्कालिन शाखा व्यवस्थापक यांना कळवली होती. तसेच लॉकर तोडण्याची विनंती त्यांच्याकडे केली होती. दरम्यानच्या कालावधीत औरंगाबाद येथील लॉकर तोडणारा आल्यावर तोडू, अहमदनगरचा लॉकर तोडणारा आल्यावर तोडू अशी उत्तरे वेळोवेळी दिली व लॉकर तोडणे टाळले. त्यानंतर बऱ्याच काळानंतर नलावडे यांच्या इमारतीचे काम काढल्याने त्यांना पैशाची गरज पडली. त्यावेळी त्यांनी पुन्हा लॉकरमधून पैसे काढण्याची विनंती केली. २४ जून रोजी सुमनबाई व त्यांचा मुलगा पांडुरंग यांच्याकडून बँकमॅनेजर यांनी विना पावतीचे लॉकर तोडण्यासाठी ३ हजार ८०० रुपये रोख घेतले व लॉकर तोडले. त्यावेळे लॉकरमधील पन्नास तोळे सोने व कागदपत्रे नसल्याचे अढळून आल्याने नलावडे यांना धक्का बसला. त्यामुळे सध्याचे मॅनेजर किशोर राजहंस यांनी दफ्तरची तपासणी केली असता दिसून आले की, २३ सप्टेंबर २००७ रोजी तत्कालीन शाखा अधिकारी याने कोणालातरी हाताशी धरुन बनावट चावी तयार करुन तिच्या अधारे रजिस्टरला इंग्रजी सही करुन सदरचे लॉकर उघडले असल्याचे समोर आले. या प्रकरणाची चौकशी करुन तत्कालीन मॅनेजर व इतर एक व्यक्ती यांची चौकशी करुन कारवाई करावी अशी मागणी नलावडे यांनी आष्टीचे पोलिस निरिक्षक यांना केली आहे. या संदर्भात प्रतिक्रीया देताना स्टेट बँक आॅफ हैद्राबादचे शाखा व्यवस्थापक किशोर राजहंस म्हणाले की, आम्ही सदरील घटनेची माहिती वरिष्ठांना कळवू. बाकी इतर तपास पोलिस करतील. (वार्ताहर)