वडीगोद्री : औरंगाबद-बीड, जालना-बीड राष्ट्रीय महामार्गावर शहागड तालुका अंबड येथील गावातून गोदावरी नदीचे विस्तीर्ण पात्र आहे. मात्र कधीकाळी सुंदर व स्वच्छ असणाऱ्या पात्रात गावातील कचरा तसेच विधी साहित्य टाकले जात असल्याने पात्र प्रदूषित होत आहे. नदीला गटारीचे स्वरूप प्राप्त झाल्याने गेवराई शहरासह आसपासच्या परिसरात या प्रदूषित झालेल्या पात्रातूनच पिण्यासाठी पाणीपुरवठा होत असल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे. शहागड हे दशक्रिया विधीसाठीचे प्रसिद्ध ठिकाण आहे. जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातून नागरिक विधीसाठी येतात. पण मात्र दशिक्र या विधी झाल्यानंतर नदी बचाव अभियान हे त्यांच्याकडून कुठल्याही पध्दतीने स्वच्छता मोहीम राबविण्यासाठी प्रयत्न होत नाहीत. त्यामुळे गोदापात्र असुरक्षित झाले आहे. गेवराई येथील शहरासाठी पाणी मिळण्यासाठी सध्या शहागड या बंधाऱ्यात पाणी सोडले जाते. दरम्यान, परिसरात होणाऱ्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्याऐवजी गंगेतच टाकला जातो. रक्षा विसर्जनही या ठिकाणी केली जाते. गोदापात्रात आणून टाकली जाते. एवढेच नाही काही कपडेही या ठिकाणी सर्रास आणून टाकले जातात. याप्रमाणे पायात घालण्याची चप्पल ही या पात्रात आणूण टाकण्याची प्रथाच पडली आहे. दशक्रि या विधी करताना जेवणावळी पत्रावळी, द्रोण, प्लॅस्टीकचे ग्लास ही येथेच टाकले जातात. गावतले गटारीचे पाणी सुध्दा पाणी पात्रात सोडले जात असल्याचे चित्र नदीपात्रात दिसून येते. (वार्ताहर)
गोदापात्र होतेय प्रदूषित
By admin | Updated: March 10, 2016 00:40 IST