शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
3
लक्षात ठेवा, नापास झाल्याने आयुष्य संपत नाही ! सचिन तेंडुलकर, नागराज मंजुळे झाले होते नापास
4
Sensex २९५ आणि Nifty ११४ अंकांच्या तेजीसह बंद; 'या' शेअर्समध्ये मोठा चढ-उतार
5
रशियाचा भारताला पाठिंबा! 'पहलगामच्या गुन्हेगारांना सोडता कामा नये'; पुतिन यांचा पीएम मोदींना फोन
6
मोदी सरकार देतंय ₹५ लाख लिमिट असलेलं क्रेडिट कार्ड; कसा मिळेल फायदा, जाणून घ्या
7
"ऋषभ पंतला पुन्हा फॉर्मात यायचे असेल तर त्याने धोनीला फोन करावा"; दिग्गज फलंदाजाचा सल्ला
8
Nashik Crime: तिन्ही कोयत्यांवर जाधव बंधूंच्या रक्ताचे डाग आहेत तसेच; महाजनच्या घरात सापडली शस्त्रे
9
Ather Energy IPO चं अलॉटमेंट 'असं' करा चेक, ग्रे मार्केट प्रीमिअम काय देतोय संकेत?
10
POK नाही तर 'लाहोर'वरही भारताचा ताबा होता; UNSC च्या मध्यस्थीनं कसा वाचला पाकिस्तान?
11
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
12
Mumbai: केतकीपाडा, फिल्मसिटी, दामूनगर येथील झोपड्यांवरील कारवाईला आठ दिवसांची मुदतवाढ
13
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
14
शाब्बास पोरी! ३ वेळा नापास होऊनही मानली नाही हार, मजुराची लेक झाली IAS अधिकारी
15
PF Account मधून किती रक्कम तुम्ही काढू शकता? काय आहेत नियम आणि अटी
16
परीक्षेत नापास, आयुष्यात पास! दहावीत मुलगा ६ विषयांत झाला फेल तरी पालकांनी कापला केक, कारण...
17
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
18
खळबळजनक! मनाविरुद्ध लग्न होताच काढला पतीचा काटा; बॉयफ्रेंडसह ७ जणांना अटक
19
'गँग्ज ऑफ वासेपूर', 'दबंग' फेम प्रसिद्ध कलाकाराचं दुःखद निधन, बॉलिवूडवर पसरली शोककळा
20
"पाकिस्तानी आर्मी तिथल्या तरुणांना आवडत नाही", बॉलिवूड सिंगरचा दावा, म्हणाला- "ते म्हणाले की तुम्ही भाग्यवान..."

गोदावरी मनार, कलंबर कारखाना विक्रीला

By admin | Updated: October 6, 2014 00:13 IST

रामेश्वर काकड, नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने गत अनेक वर्षापासून थकलेल्या कर्जाची वसुली करण्यासाठी जिल्ह्यातील गोदावरी मनार व कलंबर हे दोन सहकारी साखर कारखाने विक्रीला काढले आहेत.

रामेश्वर काकड, नांदेडजिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने गत अनेक वर्षापासून थकलेल्या कर्जाची वसुली करण्यासाठी जिल्ह्यातील गोदावरी मनार व कलंबर हे दोन सहकारी साखर कारखाने विक्रीला काढले आहेत. यामुळे जिल्हा बँकेचे कर्ज थकविलेल्या इतर सर्वच सहकारी संस्थांचे धाबे दणाणले आहेत.अवसायनात असलेल्या शंकरनगर येथील गोदावरी मनार सहकारी साखर कारखान्याकडे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ५४ कोटी ८६ लाख रुपये कर्ज थकले आहे. तर कलंबर येथील कलंबर विभाग सहकारी साखर कारखान्याकडे ४७ कोटी १८ लाख रुपयांचे कर्ज थकीत आहे.सदर कारखान्यांनी जिल्हा बँकेकडून कर्ज घेतले परंतु त्यानंतर मात्र कर्जाची परतफेड केलीच नाही़ शेवटी कारखाने अवसानायात येवून बंद पडले. यानंतर जिल्हा बँकेने साखर कारखान्याकडील थकीत कर्जाची वसुली करण्यासाठी बंद कारखाने कर्जापोटी विक्रीला काढण्याचा निर्णय घेतला आहे. गतवर्षी २०१३ या वर्षात बँकेचे एनपीएचे (अनुत्पादीत मालमत्ता) प्रमाण ३६.६१ टक्के होते. तर २०१४ या वर्षात एनपीएचे प्रमाण ३५.९२ टक्यावर आले आहे. एकूण थकलेल्या कर्जापैकी बिगरशेती एनपीएचे प्रमाण ९०.८१ टक्के तर शेतीकर्ज एनपीएचे प्रमाण ९.१९ टक्के आहे. ३१ मार्च २०१४ अखेरपर्यंत बँकेचे एकूण २०३ कोटी ६२ लाख ४१ हजार एवढे कर्ज येणे आहे. त्यापैकी बिगरशेती एनपीए १८४ कोटी ९१ लाख १४ हजार असून पैकी १४५ कोटी रुपये साखर कारखान्यांकडे थकले आहेत. यात गोदावरी मनार साखर कारखान्याकडे ५४ कोटी ८६ लाख तर कलंबर विभाग सहकारी साखर कारखान्याकडे ४७ कोटी १८ लाख थकले आहेत. कर्जाच्या वसुलीसाठी सेक्युरिटायझेशन अ‍ॅक्ट २००२ अतंर्गत कारखान्याची मालमत्ता जप्त करुन मे.डोलेक्स इंडस्ट्रीज मुंबई यांना ६ वर्षासाठी भाडेतत्वावर चालविण्यास दिला होता. त्यातून ६१६.७९ लाख वसुली झाली. परंतु कारखाना अवसायानात आल्यामुळे उर्वरित थकीत रक्कम वसुल करण्यासाठी सेक्टुरिटायझेशन अ‍ॅक्ट २००२ अंतर्गत कारखाना विक्रीस काढला आहे. याशिवाय कलंबर कारखानाही अवसायनात आल्यामुळे विक्रीस काढला.२००५ मध्ये आर्थिक परिस्थिती खालावल्याने महाराष्ट्र सहसंस्था अधिनियमानुसार बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करुन १९ मार्च २००५ मध्ये बँकेवर प्रशासकाची नेमणूक केलेली आहे. परंतु येत्या महिनाभरात बँकेवर संचालक मंडळ निवडण्यात येणार आहे. संचालक मंडळाच्या कुटान्यामुळे अवसायानात आलेल्या मध्यवर्ती बँकेची प्रशासक नेमल्यानंतर प्रगतीकडे वाटचाल सुरु आहे. चालू अर्थिक वर्षात ठेवीत १८ कोटी १२ लाखांची वाढ झाली. तर आजघडीला बँकेकडे ३०२ कोटींच्या विविध स्वरुपाच्या ठेवी जमा आहेत. बँकेस २०१४ या वर्षात २ कोटी ९८ लाख ७६ हजार रुपयांचा नफा झाला आहे. गतवर्षी वैधानिक लेखा परीक्षण अहवालानुसार बँकेस क वर्ग दिला होता, परंतु चालू अर्थिक वर्षात लेखापरीक्षण अहवालानुसार बँकेस ब वर्ग प्राप्त झाला आहे. बँकेचे नक्तमुल्य २३ कोटी ३८ लाख ऐवढे झाले असून वसुलीचे प्रमाण ६८.९२ टक्यावरुन ६९.८० टक्यावर आले. यामुळे बँकेची अर्थिक परिस्थिती सुधारलेली आहे.