शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

देव पावला... शांततेत कारवाई

By admin | Updated: May 30, 2014 01:00 IST

औरंगाबाद : उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिका, पोलीस व जिल्हा प्रशासनाने आज पहाटे ३ वाजेपासून शहरातील विकास आराखड्याच्या रस्त्यांत येणारी अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्यास प्रारंभ केला

औरंगाबाद : मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशानुसार महापालिका, पोलीस व जिल्हा प्रशासनाने आज पहाटे ३ वाजेपासून शहरातील विकास आराखड्याच्या रस्त्यांत येणारी अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्यास प्रारंभ केला. अंगुरीबागचा अपवाद वगळता कुठेही गालबोट लागले नाही. शांतता आणि संयमाने धार्मिक स्थळे हटविण्यात आल्याने प्रशासनाला ‘देव’ पावला. रोशनगेट, आझाद चौक परिसरातील दोन धार्मिक स्थळे नागरिकांनी स्वत: काढली. पहिल्या दिवशीच्या कारवाईत १२ ठिकाणची धार्मिक स्थळे विधीवत काढून त्याचा मलबा लगोलग उचलून नेण्यात आला. सकाळी ९.३० वाजेपर्यंत दोन पथकांच्या नेतृत्वाखाली मनपा आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे, जिल्हाधिकारी विक्रमकुमार, पोलीस आयुक्त राजेंद्र सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाईला सुरुवात झाली. १६ जानेवारी २०१२ पासून पाडापाडीचे सत्र सुरू झाले. तत्कालीन आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी रस्ते रुंद करण्याच्या मोहिमेत ही कारवाई सुरू केली होती. आयुक्त डॉ. कांबळे यांनी त्यांच्या दीड वर्षाच्या काळात प्रथमच एका संवेदनशील विषयाला हात घातला. अग्निशमन अधिकारी शिवाजी झनझन, उपायुक्त किशोर बोर्डे, शहर अभियंता एस. डी. पानझडे, पोलीस उपायुक्त अरविंद चावरिया, पोलीस निरीक्षक रामेश्वर थोरात व मनपा, पोलीस, महसूल कर्मचार्‍यांचा ताफा पहाटेपासून या मोहिमेत सहभागी झाला होता. पोलिसांचा ताफा अगोदर, मनपाचा नंतर मध्यरात्री १.३० वाजेपासूनच पोलिसांनी शहर ताब्यात घेतले. ज्या ठिकाणची धार्मिक स्थळे काढायची आहेत, तेथील संबंधितांना पोलिसांनी पूर्वसूचना दिली होती. पहाटे ४ वाजेपर्यंत पोलिसांनी कडक बंदोबस्त लावल्यामुळे मॉर्निंग वॉकला जाणार्‍या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. ४ वाजेपर्यंत मनपाचे पथक झोपेतच होते. पोलीस आयुक्तांच्या दट्ट्यानंतर पालिकेची यंत्रणा खडबडून जागी झाली. सकाळी ६ वाजेपर्यंत दोन पथकांची फौज दोन दिशेने निघाली. एकाच वेळी एमजीएम आणि गुलमंडी भागात कारवाई सुरू झाली. एक स्थळ पाडण्यासाठी अर्धा तास लागला. पोलीस व मनपाच्या अधिकार्‍यांनी परिस्थिती हाताळल्यामुळे तणाव निर्माण झाला नाही. आयुक्त म्हणाले... शहरातील नागरिकांंचे आभार मानून आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे म्हणाले, रोशनगेट भागातील धार्मिक स्थळ रात्री १ वाजताच नागरिकांनी स्वत: काढले. कैलासनगर येथील मंदिरही नागरिकांनीच काढले. १२ स्थळे हटविली. त्यामध्ये लोकांचा सहभाग होता. मुद्दामहून कोणतेही स्थळ हटविले नाही. कैलासनगर येथून मोहिमेस प्रारंभ झाला. शनि मंदिर परिसर वगळता कुठेही तणाव झाला नाही. मनपाचे ५० हून अधिक अधिकारी व पोलिसांचा जम्बो बंदोबस्त होता. २५ मिनिटांत एक स्थळ हटविण्यास लागले. ज्या ठिकाणी कोर्ट स्टे आहे, त्याबाबत मार्गदर्शन घेण्यासाठी मनपा कोर्टात जाईल. रस्त्यावर पोलीसच पोलीस आज पहाटेच खाकी वर्दीवाल्यांचा बंदोबस्त पाहून औरंगाबादकरांच्या मनात भय निर्माण झाले. शहरात काही घडले की काय, अशी विचारणा अनेक नागरिकांनी केली. पोलिसांच्या नाकेबंदीमुळे गुलमंडी, कैलासनगर, पैठणगेट, विद्यापीठ ते मकईगेट रस्त्यांवर नागरिकांना ९ वाजेपर्यंत प्रवेश नव्हता. आता पुढे काय.? ४१ पैकी ७ धार्मिक स्थळांवर स्थगिती आहे. काल २७ रोजी दोन स्थळांवर स्थगिती आली असून, दोन्ही धार्मिक स्थळे छावणीच्या हद्दीत आहेत. आज १२ ठिकाणी कारवाई करण्यात आली. स्थगिती आलेल्या ९ आणि उर्वरित २० ठिकाणच्या धार्मिक स्थळांबाबत मनपा न्यायालयाचे मार्गदर्शन घेणार आहे. त्यानंतर पुढील कारवाई करण्याचे संकेत आहेत. या १२ ठिकाणी कारवाई या १२ ठिकाणी कारवाई विकास आराखड्यातील रस्ताहटविलेले धार्मिक स्थळ बाराभाई ताजिया ते पैठणगेटम्हसोबा मंदिर, आसरा मंदिर पानदरिबा ते अंगुरीबागअस्थाना पानदरिबा मशीद रोशनगेट ते आझाद चौक२ दर्गा, मजार लक्ष्मण चावडी ते एमजीएमतुळजाभवनी मंदिर, स्मशान हनुमान मंदिर छोटी भिंत, लक्ष्मीदेवी, आसरा मंदिर, दर्गा मकईगेट ते विद्यापीठ छोटे हनुमान मंदिर, दर्गा.