औरंगाबाद झोन, औरंगाबादचे उपमहाप्रबंधक यांना निवेदन देऊन केली आहे.
मराठवाडा विभागातील शेतकऱ्यांना गेल्या १० वर्षांमध्ये लागोपाठच्या अवर्षण व दुष्काळी परिस्थितीमुळे सिंचन सुविधांसाठी विशेषतः मोटार पाईपलाईन, पंपसेट, ठिबक, (ट्रॅक्टर) आदी प्रकारच्या दीर्घ मुदती कर्जाची परतफेड करता येईल इतके उत्पन्न होऊ शकले नाही.
जायकवाडी धरणामध्ये पुरेसे पाणी उपलब्ध नसल्यामुळे सिंचनासाठी पाणीच उपलब्ध करून दिले नाही.
सन २००७ ते २०१४, २०१५ या कालावधीत जायकवाडी प्रकल्पातून सिंचनाच्या पुरेशा पाणी पाळ्या न दिल्यामुळे भूगर्भातील पाणी पातळी खालावली आणि १५ मीटरपेक्षा जास्त खोल गेली. यामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांना सिंचन सुविधासाठीचे कर्ज हे फेडणे दुरापास्त झाले.
कॉर्पोरेट क्षेत्राला दिलेल्या सवलतीप्रमाणे ५ टक्के रक्कम वसूल करुन परतफेड पूर्ण करावी आणि कर्ज खाते बंद करावे व शेतकऱ्यांना लाभ द्यावा, अशी विनंती निवेदनात करण्यात आली आहे.
या निवेदनावर कॉ. राजन क्षीरसागर, काॅ. अभय टाकसाळ,
शिवाजी कदम, कॉ. ओंकार पवार, माणिकराव कदम,
कॉ. मितेष सुक्रे, मुरलीधर पायघन, बाळासाहेब हरकाळ,
मुंजाभाऊ लिपने यांच्या सह्या आहेत.