शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पानगाव पोलिस ठाण्याचा तातडीने फेरप्रस्ताव द्या; गृहराज्यमंत्र्यांचे आदेश

By admin | Updated: February 26, 2016 11:46 IST

पानगाव येथील पोलिस चौकीचे पोलिस ठाण्यात रुपांतर करण्यासाठी तात्काळ फेरप्रस्ताव सादर करा, असे निर्देश गृहराज्यमंत्री प्रा. राम शिंदे यांनी जिल्हा पोलिस प्रशासनाला दिले.

 लातूर : पानगाव येथील पोलिस चौकीचे पोलिस ठाण्यात रुपांतर करण्यासाठी तात्काळ फेरप्रस्ताव सादर करा, असे निर्देश गृहराज्यमंत्री प्रा. राम शिंदे यांनी जिल्हा पोलिस प्रशासनाला दिले. दरम्यान, पोलिस ठाण्याच्या जागेचा शोध घेऊन जागा उपलब्ध करून द्यावी, असेही आदेश गृहराज्यमंत्र्यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिले आहेत. रेणापूर तालुक्यातील पानगाव हे अतिसंवेदनशील गाव आहे. गावची लोकसंख्या २५ हजारांच्या आसपास असून, तेथे असलेल्या पोलिस चौकीअंतर्गत अन्य १६ गावांचा समावेश आहे. पोलिस कर्मचार्‍यांचीही संख्या कमी आहे. गेल्या २0 वर्षांपासून पोलिस चौकीचे रुपांतर पोलिस ठाण्यात व्हावे, अशी मागणी परिसरातील लोकांची आहे. पोलिस ठाणे व्हावे म्हणून राज्य शासनाकडे प्रस्तावही सादर झालेला आहे. मात्र मंजुरी नाही. या संदर्भात 'लोकमत'मध्ये 'पानगावच्या पोलिस ठाण्याचा प्रस्ताव लालफितीत' या मथळ्याखाली वृत्त कालच प्रसिद्ध केले होते. दरम्यान, या वृत्ताची दखल घेत गृहराज्यमंत्र्यांनी जिल्हा पोलिस प्रशासनाला पानगाव पोलिस ठाण्यासाठी फेरप्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले आहेत. शिवाय, पोलिस ठाण्याला जागा उपलब्ध करून द्यावी, असेही निर्देश त्यांनी जिल्हाधिकार्‍यांना गुरुवारी दिले. शिवजयंतीनिमित्त ध्वज लावण्याच्या कारणावरून दोन पोलिस कर्मचार्‍यांवर पानगाव येथे हल्ला झाला होता. या पार्श्‍वभूमीवर गृहराज्यमंत्र्यांनी पानगावला भेट दिली. यावेळी ते म्हणाले, पानगाव येथे पोलिस ठाणे होणे आवश्यक आहे. गाव मोठे असून, चौकीअंतर्गत अनेक गावांचा समावेश आहे. त्यामुळे पोलिस ठाणेच असायला हवे. यापूर्वी जरी पोलिस ठाण्याचा प्रस्ताव पाठविला असला, तरी फेरप्रस्ताव पाठवा. त्यासाठी तात्काळ मंजुरी देण्यात येईल. पोलिस ठाण्याच्या जागेचाही प्रश्न आहे. तो प्रश्न स्थानिक पातळीवर जिल्हाधिकार्‍यांनी सोडवावा. जागा तात्काळ उपलब्ध करून द्यावी, असे निर्देशही गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी यावेळी दिले. दरम्यान, गृहराज्यमंत्र्यांनी पानगावला भेट दिल्यानंतर दुपारी १.३0 वाजता जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात बैठक घेतली. या बैठकीला पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित, विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील, जिल्हाधिकारी पांडुरंग पोले, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. ज्ञानेश्‍वर चव्हाण यांची उपस्थिती होती. यावेळीही त्यांनी पानगाव पोलिस ठाण्याचा फेरप्रस्ताव पाठविण्यासंदर्भात सूचना ■ पानगाव पोलिस ठाण्याचा प्रस्ताव यापूर्वीच पाठविण्यात आला आहे. परंतु, आता गृहराज्यमंत्र्यांनी फेरप्रस्ताव पाठविण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानुसार पूर्वी पाठविलेल्या प्रस्तावाची पडताळणी करून फेरप्रस्ताव तात्काळ पाठविला जाणार असल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक ज्ञानेश्‍वर चव्हाण यांनी सांगितले. प्रस्ताव पाठविल्यानंतर जिल्हाधिकार्‍यांची भेट घेऊन पानगाव पोलिस ठाण्याला जागा उपलब्ध करून देण्यासंदर्भात विनंती केली जाईल. राज्य शासनाकडे पानगावसह अन्य एका पोलिस ठाण्याचा प्रस्ताव आहे. ■ दोन्हीही प्रस्तावाला आता मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. त्यावरही गृहराज्यमंत्र्यांसमवेत चर्चा झाली असून, पानगावच्या पोलिस ठाण्याचा रेंगाळलेला प्रस्ताव आता मार्गी लागला असल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक ज्ञानेश्‍वर चव्हाण यांनी सांगितले.