शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

दस-यापूर्वी शेतक-यांना कर्जमाफी द्या,  शिवसेनेचा विभागीय आयुक्तालयावर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 19:35 IST

शेतक-यांना दस-यापूर्वी कर्जमाफी द्यावी, ६६ प्रकारच्या माहितीचा अर्ज भरण्याची अट शिथिल करा, यासह अन्य मागण्यांसाठी शिवसेनेने सोमवारी विभागीय आयुक्तालयावर मोर्चा काढला होता. शेतक-यांना सरसकट कर्जमाफी द्या, शिवसेना जिंदाबाद, यासह विविध घोषणा देत आणि हाती विविध मागण्यांचे फलक घेऊन शिवसेनेचे हजारो  कार्यकर्ते आणि शेतकरी या मोर्चात सहभागी झाले.

औरंगाबाद,दि, 11 : शेतक-यांना दस-यापूर्वी कर्जमाफी द्यावी, ६६ प्रकारच्या माहितीचा अर्ज भरण्याची अट शिथिल करा, यासह अन्य मागण्यांसाठी शिवसेनेने सोमवारी विभागीय आयुक्तालयावर मोर्चा काढला होता. शेतक-यांना सरसकट कर्जमाफी द्या, शिवसेना जिंदाबाद, यासह विविध घोषणा देत आणि हाती विविध मागण्यांचे फलक घेऊन शिवसेनेचे हजारो  कार्यकर्ते आणि शेतकरी या मोर्चात सहभागी झाले. औरंगपुरा येथील महात्मा फुले चौकातून काढण्यात आलेल्या या मोर्चाचा समारोप विभागीय आयुक्त कार्यालयावर झाला. 

शेतक-यांना दीड लाखापर्यंत कर्जमाफी देण्याच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेला दोन महिने उलटले तरीदेखील अद्याप एकाही शेतक-याला कर्जमाफी मिळालेली नाही. शेतक-यांना कर्जमाफीचे ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली. औरंगाबाद जिल्ह्यात १ हजार ५०० केंद्रांवर ऑनलाइन फॉर्म भरण्याची सुविधा असल्याचे सांगण्यात आले; मात्र प्रत्यक्षात केवळ ५०० केंद्रांवरच आॅनलाइन फॉर्म भरले जात आहेत. एका केंद्रावर प्रतिदिन २० ते २५ शेतक-यांनाच अर्ज भरणे शक्य होते. ही बाब लक्षात घेऊन अर्ज भरण्याची मुदत वाढवावी, शेतक-यांकडून भरण्यात येणा-या अर्जांमध्ये ६६ प्रकारची माहिती अनावश्यक आहे.

यामुळे शेतक-यांना नाहक जाच आणि त्रास होत असल्याने यातून शेतक-यांची मुक्तता करावी, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीची अंमलबजावणी करावी आदी मागण्यांसाठी शिवसेनेतर्फे सोमवारी संपूर्ण राज्यात जिल्हास्तरीय मोर्चे काढण्यात आले. औरंगाबादेतही शिवसेनेने मोर्चा काढला. हाती भगवे ध्वज, कर्जमाफीची मागणी करणारे फलक आणि भगवे रुमाल गळ्यात घालून हजारो कार्यकर्ते आणि शेतकरी मोर्चात सहभागी झाले. शिवसेना जिंदाबाद, उद्धव ठाकरे जिंदाबाद, दस-यापूर्वी शेतक-यांना सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे, आदी घोषणांनी मोर्चाचा मार्ग दणाणला. 

 विभागीय आयुक्तांना निवेदनविभागीय आयुक्तालयासमोर मोर्चाचा समारोप झाल्यानंतर खासदार चंद्रकांत खैरे, संपर्क प्रमुख विनोद घोसाळकर, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, नरेंद्र त्रिवेदी, आमदार संजय शिरसाट, आमदार संदीपान भुमरे, माजी आमदार आर. एम. वाणी, माजी आमदार प्रदीप जैस्वाल, माजी आमदार अण्णासाहेब माने, उपमहापौर स्मिता घोगरे, महिला आघाडीच्या सुनीता आऊलवार, माजी महापौर कला ओझा यांच्या शिष्टमंडळाने विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. शिष्टमंडळाने विभागीय आयुक्तांशी शेतक-यांच्या मागण्यांसंदर्भात चर्चा केली. यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम, उपायुक्त वर्षा ठाकूर आदी उपस्थित होते.