शहरं
Join us  
Trending Stories
1
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
2
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
3
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
4
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
5
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
6
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
7
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
8
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
9
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
10
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
11
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
12
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
13
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
14
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
15
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
16
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
17
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
18
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
19
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
20
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...

कामगिरी पाहून उमेदवारी देणार

By admin | Updated: July 18, 2014 01:53 IST

औरंगाबाद : भाजपाच्या विद्यमान आमदारांची कामगिरी पाहूनच त्यांना उमेदवारी देण्यात येणार आहे.

औरंगाबाद : भाजपाच्या विद्यमान आमदारांची कामगिरी पाहूनच त्यांना उमेदवारी देण्यात येणार आहे. पक्षाला ‘अच्छे दिन’ येताच इच्छुकांची उमेदवारी मागण्यासाठी भरती आल्यामुळे ती स्पर्धा रोखण्यासाठी पक्षाने (केआरए) ‘की रिझल्ट एरिया’चे निकष लावून परफॉर्मन्स तपासणीचा निर्णय घेतला आहे, असे प्रदेशाध्यक्ष आ. देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले. विद्यमान आमदारांच्या कामाचे आॅडिट (परीक्षण) करण्यात येईल. जे आमदार त्या परीक्षणात खरे उतरणार नाहीत, त्यांचा निर्णय पक्ष संसदीय समिती व बोर्ड घेईल, असेही ते म्हणाले. भाजपाच्या विभागीय पदाधिकाऱ्यांची बैठक औरंगाबाद जिमखाना येथे पार पडली. सकाळी ८ ते दुपारी ३ पर्यंत झालेल्या त्या बैठकीत सर्व जिल्ह्यांतील पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेण्यात आली. बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना आ.फडणवीस म्हणाले, २५ जुलैपर्यंत पक्षाचे संघटन, १०० टक्के बुथ बांधणी पूर्ण होईल. त्यानंतर १ मंत्री एका विधानसभा मतदारसंघात एक दिवस फिरून आढावा घेईल. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, विधान परिषद विरोधी पक्षनेते आ. विनोद तावडे, आ. पंकजा पालवे, आ. संभाजी निलंगेकर, आ. सुधीर मुनगंटीवार, सुजितसिंह ठाकूर, गणेश हाके, माजी आ. हरिभाऊ बागडे, शिरीष बोराळकर, भगवान घडामोडे आदींची पत्रपरिषदेला उपस्थिती होती. राज्य शासनाने मुस्लिम समाजाला दिलेल्या आरक्षणावर भाजपाने आक्षेप घेतला आहे. महायुतीच्या बाबतीत किंवा एकमेकांच्या पक्षाबाबत उलटसुलट वक्तव्ये करू नयेत. आमच्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांनाही तसेच सांगितले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जे बोलतील तेच अधिकृत मानले जाईल. सरकारचे निर्णय बदलू निवडणुकीच्या तोंडावर सरकारने घाई घाईने जे निर्णय घेण्याचा सपाटा लावला आहे ते सर्व निर्णय महायुतीचे सरकार येताच बदलून टाकू. काँग्रेसचे माजी मंत्री कृपाशंकर सिंह यांच्यावर अपसंपदेप्रकरणी कारवाई करण्यासाठी अध्यक्षांच्या परवानगीची गरज कशासाठी आहे. त्यांना क्लीन चीट देण्यासाठीच ही उठाठेव सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.१५ आॅगस्टनंतर पहिली यादीभाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यासोबत बैठक झाली आहे. महायुती अभेद्य राहणार आहे. युती तुटणार नाही. ६ पक्ष महायुतीमध्ये असून, नवीन कोणताही पक्ष आता या युतीमध्ये येणार नाही. महायुतीसोबत जागा वाटपाची चर्चा होऊन १५ ते २० आॅगस्टदरम्यान भाजपाची पहिली उमेदवार यादी जाहीर होईल. महायुतीला अनुकूलता आहे. मोठ्या प्रमाणात यश मिळेल, असा दावा करीत आ. फडणवीस म्हणाले, लोकसभेत अनेक विधानसभा मतदारसंघात भाजपाला यश मिळाले आहे.मराठवाड्यातही मोठ्या प्रमाणात यश मिळवू. मराठवाड्यात भाजपाच्या वाट्याला उचित जागा येतील. जागा बदलणे, वाढवून मागणे, फेरबदल करणे याबाबत महायुतीच्या बैठकीत निर्णय होईल. मुंडे यांच्या निधनानंतर पोकळी निर्माण झाली आहे. आ. पंकजा पालवे कोअर कमिटीमध्ये असून, त्यांच्या माध्यमातून मुुंडेंचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे.