दिनेश गुळवे , बीड राज्य मंडळाचा बारावीचा निकाल सोमवारी दुपारी जाहीर झाला. ‘हम भी कुछ कम नही’ म्हणत यावर्षीही जिल्ह्यात निकालात बाजी मारण्यात मुलांपेक्षा मुली सरस ठरल्या. निकालात मुलींनी मुलांना धोबी पछाड दिली असून तब्बल ९४ टक्के मुली उत्तीर्ण ठरल्या आहेत. यावर्षी जिल्ह्यातील २९ हजार २७७ विद्यार्थ्यांनी कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतून १२ वीच परीक्षा दिली होती. यातील २७ हजार ३९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये ९४.२० टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत तर मुलांची टक्केवारी ९१.४० आहे. जिल्ह्यात १८ हजार ७१९ मुले तर १० हजार ५५८ मुलींनी १२ वीची परीक्षा दिली होती. यापैकी १७ हजार ११० मुले तर ९ हजार ९२९ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. विज्ञान शाखेचा निकाल ९६.१३, कला शाखेचा ८९.०९ तर वाणिज्य शाखेचा निकाल ९४.१९ टक्के लागला आहे. यावर्षीही मुलींनी निकालात बाजी मारली आहे. गेल्या वर्षी मुलींचा निकाल ८७.७६ तर मुलांचा ८७.३० टक्के लागला होता. जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात मुलींची टक्केवारी अधिक आहे. त्या खालोखाल बीड व वडवणी तालुक्याचा समावेश आहे. आज अनेक क्षेत्रात मुली बाजी मारत सरसावत असल्याचे दिसून येत आहे. त्यात १२ वीच्या परीक्षांचीही भर पडली आहे. मुली एकाग्रतेने करतात अभ्यास निकाला संदर्भात प्रा. गणेश पवळ म्हणाले की, अनेकदा मुलींना घरातील काम पाहून अभ्यास करावा लागतो. मुलांच्या तुलनेत मुलींना घरकाम अधिक असल्याचे समाजात दिसून येते. इतर कामातच मुलांचा वेळा जातो वाया उत्तीर्ण होणार्यांमध्ये मुलांपेक्षा मुलींचे प्रमाण अधिक आहे. अपयशी होणार्या विद्यार्थ्यांमध्ये मुलांचे प्रमाण अधिक आहे. अनेक विद्यार्थी अभ्यासापेक्षा इतर कामांतच अधिक वेळ दवडत असल्याचे अनेकदा दिसून येते. यामुळे मुलांना पालकांनीही योग्य मार्गदर्शन करण्याची गरज आहे. मुलांच्या अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रीत केल्यास मुलांची टक्केवारीही नक्कीच वाढेल, असे मत प्रा. शिवलाल घुगे यांनी व्यक्त केले. अशी आहे आकडेवारी तालुका मुलांची टक्केवारी मुलींची टक्केवारी बीड ९३.६१ ९५.२४ पाटोदा ९३.१ ९३.४ आष्टी ९१.६५ ९५.१० गेवराई ९३.४७ ९५.४८ माजलगाव ८७.३३ ९३.३२ अंबाजोगाई ८६.७२ ९४.२३ केज ९३.९१ ९३.३८ परळी ८६.०१ ९१.०१ धारूर ८४.८४ ८९.६९ शिरूरकासार ९०.७४ ९१.८६ वडवणी ९३.६४ ९५.३
जिल्ह्यातील मुलींचा झेंडा अटकेपार...
By admin | Updated: June 3, 2014 00:44 IST