शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

'लिव्ह इन' मध्ये राहणा-या प्रेयसीची प्रियकराविरुद्ध बलात्काराची तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 17:32 IST

'लिव्ह इन' मध्ये राहत असताना प्रियकराने लग्नाचे अमिष दाखवून प्रेयसीसोबत शारिरीक संबंध ठेवल्यानंतर ती गर्भवती राहिली. परंतु, प्रियकराने वयाचे कारण देत लग्नाला नकार दिल्याने संतप्त प्रेयसीने त्याच्या विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

ठळक मुद्देसहा महिन्यापासून जाधववाडी येथील प्रेमी युगुल 'लिव्ह इन रिलेशन' राहत होते. तरूणीचे वय २१ वर्ष तर आरोपी स्वप्नील हा २० वर्षाचा आहे. प्रियकराने वयाचे कारण देत लग्नाला नकार दिल्याने संतप्त प्रेयसीने त्याच्या विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

ऑनलाईन लोकमत 

औरंगाबाद, दि. ३१ : सहा महिन्यापासून जाधववाडी येथील प्रेमी युगुल 'लिव्ह इन रिलेशन' राहत होते. यातील प्रियकर प्रेयसिपेक्षा वयाने लहान आहे. 'लिव्ह इन' मध्ये राहत असताना प्रियकराने लग्नाचे अमिष दाखवून प्रेयसीसोबत शारिरीक संबंध ठेवल्यानंतर ती गर्भवती राहिली. परंतु, प्रियकराने वयाचे कारण देत लग्नाला नकार दिल्याने संतप्त प्रेयसीने त्याच्या विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. यासोबतच त्याला वेळोवेळी मदत करणा-या त्याच्या वडिलाविरूद्धहि तिने सिडको ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे. 

स्वप्नील किसन गवळे आणि किसन पुंजाजी गवळे (रा. जाधववाडी, नवा मोंढा परिसर)अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याविषयी अधिक माहिती देताना सिडको पोलिसांनी सांगितले की, सिडको परिसरात राहणारी तक्रारदार तरूणीचे वय २१ वर्ष तर आरोपी स्वप्नील हा २० वर्षाचा आहे. दोन वर्षापूर्वी पीडिता आणि आरोपीची स्वप्नीलची भेट झाली. सुरवातील त्यांच्यात मैत्री झाली. मैत्रीचे  रुपांतर प्रेमात झाले. सहा महिन्यापूर्वी दोघेही घरातून पळून गेले होते. याप्रकरणी स्वप्नीलविरूद्ध पोलिसांत गुन्हा  नोंद झाला होता. तेव्हा पोलिसांनी या प्रेमी युगूलास पकडून उच्च न्यायालयासमोर हजर केले असता तिने आईवडिलांकडे जाण्यास नकार दिला होता.तेव्हापासून ती स्वप्नीलसोबत राहात होती.

दरम्यान, स्वप्नीलने लग्नाचे अमिष दाखवून तिच्याशी शारिरीक संबंध ठेवले. परिणामी पीडिता आज पाच महिन्याची गर्भवती आहे. लग्नासाठी मुलाचे वय २१ वर्ष असणे बंधनकारक आहे. वय कमी पडत असल्याने स्वप्नीलने तिला लग्नास नकार दिला. आरोपी लग्न करीत नसल्याने पीडितने सिडको ठाण्यात तक्रार नोंदविली. शिवाय, स्वप्नीलच्या वडिलांनेही त्यास वेळोवेळी पैसे पुरवून पीडितेसोबत राहण्यास प्रोत्साहित केल्याचे पीडितेने पोलिसांना सांगितले.  पोलिसांनी गुन्हा  नोंदविला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सागर कोते हे करीत आहेत.