शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

घाडगे दाम्पत्याची हत्या करून सोम्याने खुलेआम चालविली रिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 00:41 IST

: गेवराई येथील घाडगे दाम्पत्य हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सोमनाथ उर्फ सोम्या शेºया भोसले (१९ रा.गेवराई) हा सहा दिवसांपासून गेवराई ते अंबड अशी रिक्षा चालवत असल्याचे तपासात समोर आले आहे

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : गेवराई येथील घाडगे दाम्पत्य हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सोमनाथ उर्फ सोम्या शेºया भोसले (१९ रा.गेवराई) हा सहा दिवसांपासून गेवराई ते अंबड अशी रिक्षा चालवत असल्याचे तपासात समोर आले आहे. सोम्यासह अन्य एकाने घरात प्रवेश करीत घाडगे यांचा दारूच्या नशेत काटा काढल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले.२३ आॅगस्ट रोजी पहाटे भवानी बँकेचे वसुली अधिकारी आदिनाथ घाडगे व त्यांची पत्नी अलका घाडगे यांची चोरांनी हत्या करून त्यांच्या दोन मुलींवर धारदार शस्त्रांनी हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली होती. त्यानंतर पोलिसांनी तपासासाठी कंबर कसली होती. स्थानिक गुन्हे शाखा, दरोडा प्रतिबंधक पथक व गेवराई पोलीस हे तपास करण्यासाठी रात्रंदिवस धावपळ करीत होते. बँक, घरगुती, वसुली, भांडण, चोरी यासारख्या विविध मुद्यांना डोळ्यासमोर ठेऊन पोलीस तपास करीत होते. परंतु हाती काहीच ठोस असा धागा लागत नव्हता. त्यातच पोलिसांना घटनास्थळी अपेक्षित पुरावे न मिळाल्याने हा तपास लावण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते.दरम्यान, पोलिसांनी रेकॉर्डवरील सर्व गुन्हेगारांची चाचपणी केली. परंतु काहीच हाती लागले नाही. हे गुन्हेगार जवळपासचे असू शकतात, असा संशय पोलिसांना आला. त्याप्रमाणे त्यांनी गेवराईतील सर्व आरोपी शोधले. परंतु सोम्या काही केल्या येत नव्हता. त्यामुळे संशय बळावला. तसेच खबºयांमार्फत पोलिसांनी ठोस असा पुरावा मिळाला. मग संशयाला दुजोरा मिळाला.रविवारी रात्री एक वाजेच्या सुमारास बसस्थानकाजवळील एका हॉटेलमध्ये सोम्या मित्रांसोबत दारू पीत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा रचून त्याच्या मुसक्या आवळल्या. त्यानंतर खाक्या दाखविताच गुन्ह्यांची कबूली दिली.तत्पूर्वी, सोम्यासह अन्य एकाने घाडगे यांची हत्या दारूच्या नशेतच केली असावी, असा संशय व्यक्त होत होता. याला पोलिसांकडून दुजोरा मिळाला. हत्या करून पसार झालेल्या सोम्याने दुसºया दिवसापासूनच अगदी ‘सभ्य’ बनत गेवराई ते अंबड असा रिक्षा चालविला. पोलिसांसह कोणालाच त्यावर संशय आला नव्हता.एवढा गंभीर गुन्हा करूनही सोम्याने अशा प्रकारे खुलेआम रिक्षा चालविणे म्हणजे तो किती शांत डोक्याने गुन्हे करीत असे हे लक्षात येते.