शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शौचालयाचे अनुदान मिळेना; ग्रामपंचायतीला ठोकले कुलूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 01:03 IST

वजनापूर येथील शौचालय अनुदानाचे पैसे मिळत नसल्याच्या कारणावरून लाभार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनी (दि.१५) ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकून १०० टक्के अनुदान मिळे पर्यंत कामकाज होऊ देणार नाही, अशी भूमिका लाभार्थ्यांनी घेतली

लोकमत न्यूज नेटवर्कलासूर-स्टेशन : वजनापूर येथील शौचालय अनुदानाचे पैसे मिळत नसल्याच्या कारणावरून लाभार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनी (दि.१५) ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकून १०० टक्के अनुदान मिळे पर्यंत कामकाज होऊ देणार नाही, अशी भूमिका लाभार्थ्यांनी घेतली आहे. परिणामी सलग दुसºया दिवशी ग्रामपंचायत कार्यालय कुलूप बंद होेते.शासनाने शंभर टक्के शौचालय बांधण्यासाठी चंग बांधला आहे. त्या करिता कर्मचाºयांना विहित वेळेची मर्यादा देऊन, ग्रामस्थांना प्रती शौचालय १२ हजार सानुग्रह अनुदान देण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे शौचालय बांधकाम करून घेण्यासाठी ग्रामस्थांनी उधार उसनवारी करून घेतले आहे.येथील जवळपास २४१ शौचालय पूर्ण झाले असून १२७ शौचालयांचे प्रस्ताव अनेक दिवसांपासून पंचायत समिती कार्यालयात दाखल करण्यात आले आहे. दाखल असलेले प्रस्तावाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करीत शौचालय अनुदानाच्या लाभार्थ्यांनी पंधरा आॅगस्ट रोजी ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकण्याचा निर्णय घेतला.मंगळवारी (दि.१५) सकाळी ध्वजारोहण होताच लाभार्थ्यांनी आक्रमक भूमिका घेत कार्यालयाला टाळे ठोकले व शंभर टक्के अनुदान मिळेपर्यंत ग्रामपंचायतीचे कामगाज होऊ देणार नाही अशी भूमिकाघेतली आहे.या प्रकरणाची माहिती मिळताच गटविकास अधिकारी विद्याधर पाटील यांनी गावात जाऊन ग्रामस्थांशी चर्चा करून २५ टक्के लाभार्थ्यांना अनुदान देण्यात येईल, असे तोंडी आश्वासन दिले. त्यावर ग्रामस्थांचे समाधानी झाले नाही. गटविकास अधिकाºयांना रिकाम्या हाताने माघारी जावे लागले. त्यामुळे दोन दिवसांपासून येथील ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप कायम आहे.या बाबत गटविकास अधिकारी पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, १०० टक्के लाभार्थ्यांना तात्काळ अनुदान देण्याची मागणी करण्यात आली आहे. परंतु पुरेसा निधी नसल्यामुळे काही काळ लाभार्थ्यांना प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता आहे.