भोकरदन: वालसांवगी येथील पायल व लक्ष्मी खून प्रकरणातील खरे आरोपी जेरबंद झाल्यामुळे ग्रामपंचायतचे सदस्य विजय गवळी व त्यांची पत्नी वंदना गवळी यांची पोलिसांनी सुटका केली आहे़वालसांवगी येथे पंधरा दिवसांपूर्वी पायल वाघमारे (वय ७ महिने) व लक्ष्मी सोनुने (वय ८ वर्ष) या चिमुकल्या मुलींचे अपहरण करून खून करण्यात आला होता. या प्रकरणात ज्या मोबाईल क्रमांकावरून खंडणीसाठी मागणी करण्यात आली होती. त्या क्रमांकाचे कार्डधारक विजय गवळी व त्यांची पत्नी वंदना गवळी यांना पोलिसांनी अटक करून पोलिस कोठडी घेतली होती.मात्र, तपास करीत असताना कल्पना सोनुने व तिच्या कुटुंबियांनी हे निर्घृण कृत्य केल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाल्यामुळे पारध पोलिसांनी विजय गवळी व वंदना गवळी यांची मुक्तता केली आहे़ असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, या प्रकरणात अधिक तपास सुरू आहे. (वार्ताहर)
गवळी दाम्पत्याची सुटका
By admin | Updated: June 8, 2014 00:57 IST