शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

गॅस सिलिंडरचा स्फोट; एक जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2017 23:54 IST

तालुक्यातील घोळवा येथे २२ आॅगस्ट रोजी संध्याकाळी ४.३० वाजेच्या सुमारास गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. तर यामध्ये घरातील सर्व साहित्य जळून खाक झाल्याने मोठे नुकसान झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्ककळमनुरी : तालुक्यातील घोळवा येथे २२ आॅगस्ट रोजी संध्याकाळी ४.३० वाजेच्या सुमारास गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. तर यामध्ये घरातील सर्व साहित्य जळून खाक झाल्याने मोठे नुकसान झाले आहे.घोळवा येथील प्रसाद किशनराव पोले (३५) यांनी संध्याकाळी ४.३० वाजेच्या दरम्यान राहत्या घरी गॅस सुरू करून त्यावर चहा केला. चहा घेतल्यानंतर ते बिछान्यावर पडले. यादरम्यान मात्र गॅस लिकेज झाला होता. त्यामुळे अचानक स्फोट झाला. टाकी मात्र तरीही शाबूत असल्याने लिकेजचा अंदाज व्यक्त होत आहे. या स्फोटामुळे घरात आग लागली. यात टीव्ही, कूलर, अलमारीतील साहित्य, पलंग, गादी व इतरही साहित्य जळाले. तसेच घरावरील टीनपत्रे उडाली व त्यांचेही नुकसान झाले. प्रसाद पोलेही चांगलेच भाजल्या गेले. या स्फोटाच्या आवाजाने गावातील डिगांबर मस्के, गजानन कदम, बालासाहेब मस्के, संतोष पोले, कैलास भीसे, अनिल कापसे आदी जमा झाले. या सर्वांनी घरात प्रवेश करून आग विझविली व प्रसाद पोले यांना कळमनुरीच्या ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. येथे प्राथमिक उपचार करून जखमीला नांदेड येथे हलविण्यात आले.जखमीवर डॉ. आनंद मेने यांनी उपचार केले. पोले हे ५५ टक्के भाजले असून, त्यांना पुढील उपचारासाठी नांदेड येथे पाठविण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. मेने यांनी दिली.घरी एकटेच होतेजखमी प्रसाद पोले यांच्या घरची सर्व मंडळी शेतात गेली होती. ते एकटेच घरी होते. त्यामुळे प्रसाद यांना एकट्यालाच यात दुखापत झाली.