शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

शहरातला कचरा रस्त्यावर !

By admin | Updated: March 29, 2016 00:46 IST

लातूर : नांदगाव येथील कचरा डेपोवर कचरा टाकण्यास नांदगांव व वरवंटी ग्रामस्थांनी विरोध केल्यामुळे शहरातला कचरा रस्त्यावर साचला आहे़

लातूर : नांदगाव येथील कचरा डेपोवर कचरा टाकण्यास नांदगांव व वरवंटी ग्रामस्थांनी विरोध केल्यामुळे शहरातला कचरा रस्त्यावर साचला आहे़ गेल्या महिनाभरापासून कचऱ्याची समस्या निर्माण झाली असून, शहरात जिकडे तिकडे कचरा साचला आहे़ दररोज १०० टन कचरा साचत असल्याने शहरातील नागरिक त्रस्त झाले आहेत़ कचऱ्याच्या प्रश्नावर नांदगांव ग्रामस्थ व मनपा अधिकाऱ्यांची बैठक अनेकदा झाली़ परंतू, तोडगा निघाला नसल्यामुळे शहरातल्या रस्त्यांवर कचरा साचला आहे़ हरीत न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन लातूर मनपाने केले असल्याचा आरोप ग्रामस्थांचा असून, न्यायालयाच्या आदेशानुसार कचऱ्याची विल्हेवाट न लावता डेपोवर कचरा टाकला जातो, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे़लातूर शहरातील कचरा नांदगांव येथील कचरा डेपोवर गेल्या अनेक वर्षांपासून टाकला जातो़ परंतू, ओला व सुका कचरा असे वर्गीकरण केले जात नाही़ शिवाय, कचरा डेपोला संरक्षण भिंत बांधली गेली नाही़ तसेच कचऱ्याचे वर्गीकरण होत नसल्यामुळे दुर्गंधी पसरते़ त्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे़ परिसरातील पाणी दूषीत होत आहे़ त्यामुळे नागरिकांनी हरीत न्यायालयात धाव घेतली होती़ न्यायालयाने गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार संरक्षण भिंत बांधण्याचे तसेच कचऱ्याचे वर्गीकरण करण्याच्या सूचना मनपा प्रशासनाला दिल्या होत्या़ परंतू, न्यायालयाच्या आदेशाचे पालन न करता कचरा टाकला जात असल्याने गावकऱ्यांनी कचरा टाकण्यास विरोध केला आहे़ त्यामुळे गेल्या महिनाभरापासून शहरातला कचरा शहरातल्या रस्त्यांवर साचत आहे़ दररोज १०० टन कचरा साचत असल्याने सद्यस्थितीत शहरात ३ हजार टन कचरा साचला आहे़ पोलिस बंदोबस्तात मनपाने कचरा डेपोवर कचरा टाकण्या प्रयत्न केला़ परंतू, नांदगांव व परिसरातील गावकऱ्यांनी विरोध कायम ठेवला आहे़ दररोज २५ ट्रॅक्टर कचरा डेपोवर टाकला जात होता़ दोन दिवसांपूर्वी १५ ट्रॅक्टर कचरा पोलिस बंदोबस्तात टाकण्यात आला़ ही बाब गावकऱ्यांना समजताच त्यांनी विरोध केला आहे़ त्यामुळे पुन्हा शहरातला कचरा ठप्प झाला आहे़ औसा रोड, नांदेड नाका, विवेकानंद चौक, रेणापूर नाका व रिंगरोड परिसरात कचऱ्याचे ढीग पडले आहेत़ स्वच्छता निरीक्षक कलीम शेख यांनी गावकऱ्यांची भेट घेवून कचरा डेपोवर टाकण्या संदर्भात विनंती केली़ परंतू, अगोदर न्यायालयाच्या निर्देशानुसार उपाययोजना करा नंतरच कचरा टाका अशी भुमिका गावकऱ्यांनी घेतली आहे़ (प्रतिनिधी)