शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

वडगाव-बजाजनगरात गँगवॉर; सराईत गुन्हेगाराचा दगडाने ठेचून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:05 IST

वाळूज महानगर : वडगाव- बजाजनगरात पुन्हा गँगवॉर उफाळले असून, २७ वर्षीय सराईत गुन्हेगाराचा अज्ञात मारेकऱ्यांनी दगडाने ठेचून खून केल्याची ...

वाळूज महानगर : वडगाव- बजाजनगरात पुन्हा गँगवॉर उफाळले असून, २७ वर्षीय सराईत गुन्हेगाराचा अज्ञात मारेकऱ्यांनी दगडाने ठेचून खून केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी रात्री १० वाजेच्या सुमारास बजाजनगरात घडली. या हल्ल्यात गंभीर जखमी गुन्हेगाराची ओळख पटली असून, त्याचे नाव विशाल ऊर्फ मड्ड्या किशोर फाटे (रा. वडगाव) असे असून, तो वडगावात गतवर्षी योगेश प्रधान या तरुणाच्या खूृन प्रकरणातील आरोपी आहे.

याविषयी अधिक माहिती अशी की, बजाजनगरातील हॉटेल मृगनयनीसमोर शुक्रवारी १० वाजेच्या सुमारास एका तरुणास दोन अनोळखी व्यक्ती मारहाण करीत असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीनी एमआयडीसी वाळूज पोलिसांना दिली. ही माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली. यावेळी एक अनोळखी तरुण रक्ताच्या थारोळ्यात घटनास्थळी बेशुद्ध पडलेला असल्याचे, तसेच दगडाने त्याचा चेहरा ठेसलेला असल्याचे पोलिसांना दिसून आले. गंभीर जखमी अवस्थेत त्या अनोळखी तरुणास पोलिसांनी उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून त्यास मयत घोषित केले.

फाटे हा सराईत गुन्हेगार

बजाजनगरात दगडाने ठेचून खूृन केलेल्या मयत तरुणाची ओळख पटली असून, त्याचे नाव विशाल ऊर्फ मड्ड्या किशोर फाटे (२७, रा. वडगाव कोल्हाटी), असे आहे. मयत विशाल हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात जवळपास गंभीर स्वरूपाचे ७ ते ८ गुन्हे दाखल आहेत. गतवर्षी वडगावातील योगेश प्रधान या तरुणाच्या खून प्रकरणातही विशालचा सहभाग होता. या खूृन प्रकरणात विशाल हा वर्षभर हर्सूल कारागृहात होता. पंधरा दिवसांपूृर्वीच विशाल याची जामिनावर सुटका झाल्याने तो घरी परतला होता.

गँगवारचा वाद पुन्हा उफाळला

वडगाव- बजाजनगरात वर्चस्व प्रस्थापित करण्यावरून गेल्या काही वर्षांपासून दोन गटांत सतत वादविवादाच्या घटना घडत आहेत. गतवर्षी १७ मे रोजी योगेश प्रधान या तरुणाचा चौघा आरोपींनी चाकूने वार करून, तसेच दगडाने ठेचून निर्घृणपणे खून करण्यात आला होता. या खून प्रकरणातील जितेंद्र दहातोंडे, विकास गायकवाड, करण साळे व विशाल फाटे या चौघा आरोपींचा सहभाग असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले होते. योगेश प्रधान याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी जामिनावर सुटलेल्या विशाल फाटे याचा मयत योगेश प्रधान याच्या साथीदारांनी दगडाने ठेचून खून केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.

फोटो ओळ-

बजाजनगरात सराईत गुन्हेगार विशाल ऊर्फ मड्ड्या फाटे याचा दगडाने ठेचून निर्घृणपणे खून करण्यात आला असून, घटनास्थळाची पाहणी करताना पोलीस निरीक्षक प्रशांत पोतदार व सहकारी. इन्सेटमध्ये मयत विशाल फाटे.

फोटो क्रमांक-मर्डर स्पॉट फोटो १/२/३/४