शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

गंगापूर साखर कारखाना पश्चिम महाराष्ट्रातील नेत्याच्या घशात घालण्याचा डाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:04 IST

गंगापूर कारखान्यातील १५ कोटींच्या कथित अपहारप्रकरणी बंब यांच्यासह संचालक मंडळाविरुद्ध डोणगावकर यांच्या तक्रारीवरून गंगापूर पोलीस ठाण्यात तीन महिन्यांपूर्वी ...

गंगापूर कारखान्यातील १५ कोटींच्या कथित अपहारप्रकरणी बंब यांच्यासह संचालक मंडळाविरुद्ध डोणगावकर यांच्या तक्रारीवरून गंगापूर पोलीस ठाण्यात तीन महिन्यांपूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला. या पार्श्वभूमीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत बंब यांनी अपहाराच्या आरोपांचे खंडन केले. ते म्हणाले, दररोज दोन हजार मेट्रिक टन गाळप क्षमता, ३५० एकर जमीन, ३० हजार लिटर क्षमतेची डिस्टिलरी असणारा गंगापूर साखर कारखाना २००८ मध्ये विक्रीस निघाला. विद्यमान जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या राजाराम फूड्‌स समूहाने तो खरेदी केला. तत्कालीन अध्यक्ष कैलास पाटील यांनी विक्री रोखण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली, परंतु त्यांना यश आले नाही. २०१० यावर्षी त्यांनी आपल्याशी संपर्क साधून, कारखाना वाचविण्याची गळ घातली. त्यानुसार मी पुढाकार घेऊन न्यायालयात गेलाे असता, न्यायालयाने कारखान्याच्या नावे ९ कोटी रुपये भरण्याची अट घातली. शेतकरी, हितचिंतक व मित्रांकडून ही रक्कम उसनी घेऊन बँकेत भरणा करून कारखान्याची विक्री थांबवली.

‘मोठ्या न्यायालयीन लढाईनंतर कारखाना शेतकऱ्यांच्या मालकीचा झाला. २०१५ यावर्षी कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक होऊन मी अध्यक्ष झालो. शेतकऱ्यांनी जमा केलेली रक्कम कोर्टाने व्याजासह परत केली. कारखान्याला धनाकर्षाद्वारे १५ कोटी ८० लाख रुपये मिळाले. तीनजणांच्या नावाने ‘जीपीए’ करून शेतकऱ्यांना रक्कम वाटप करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. दोनशेवर शेतकऱ्यांना २ कोटी २१ लाख रुपयांचे वाटप करण्यात आले, परंतु कृष्णा डोणगावकर यांनी राजकीय दबाब आणून गंगापूर पोलिसांना १८ नोव्हेंबर २०२० रोजी आमच्याविरोधात खोटा गुन्हा दाखल करण्यास भाग पाडले, असा आरोप आमदार बंब यांनी यावेळी केला.