शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

वाहनचोरांची टोळी पोलिसांच्या जाळ्यात

By admin | Updated: August 13, 2014 01:41 IST

औरंगाबाद : शहर व परिसरातून दुचाकी चोरी करून त्या ग्रामीण भागात नेऊन विक्री करणाऱ्या एका टोळीला गुन्हे शाखा पोलिसांनी सोमवारी रात्री वाळूज परिसरात अटक केली

औरंगाबाद : शहर व परिसरातून दुचाकी चोरी करून त्या ग्रामीण भागात नेऊन विक्री करणाऱ्या एका टोळीला गुन्हे शाखा पोलिसांनी सोमवारी रात्री वाळूज परिसरात अटक केली. या टोळीतील अटक केलेल्या चारही आरोपींच्या ताब्यातून चोरीच्या चार दुचाकी जप्त करण्यात आल्या.आरोपींमध्ये कलीम खान ऊर्फ अजमेरा सत्तार खान (३०, रा. त्रिवेणीनगर, कटकटगेट), सचिन अशोक वाहूळ (रा. समतानगर), सचिन सूर्यकांत बिजोरो (रा. रांजणगाव), रवी सुधाकर पवार (रा. कुऱ्हाडी, ता. जिंतूर, परभणी) यांचा समावेश आहे. त्यांचा एक साथीदार संतोष लक्ष्मण साळुंके (रा. रांजणगाव) हा पोलिसांना चकमा देऊन पळून जाण्यात यशस्वी ठरला. आरोपी कलीम खान याच्या विरुद्ध चोऱ्या, दरोडा, घरफोड्यांचे अनेक गुन्हे दाखल आहेत, तर सचिन वाहूळविरुद्धही चोरीचे काही गुन्हे दाखल आहेत. कारवाईबाबत पोलिसांनी सांगितले की, वाळूज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दावत हॉटेलवर वरील चार आरोपी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा पोलिसांना खबऱ्याकडून मिळाली. माहिती मिळताच रात्री पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार सुभाष खंडागळे, जमादार मच्छिंद्र ससाणे, रावसाहेब जोंधळे, सय्यद रफियोद्दीन, देवीदास इंदुरे, अशोक नागरगोजे, सुरेश कुसाळे, प्रभाकर राऊत, भानुदास पवार, शेख जावेद व त्यांच्या सहकाऱ्यांनी दावत हॉटेल गाठले. तेथे वरील चारही आरोपी काही तरी गंभीर गुन्हा करण्याच्या उद्देशाने तयारीनिशी बसलेले पोलिसांना सापडले. पाचवा आरोपी पोलिसांना पाहून पळून गेला. पकडलेल्या आरोपींकडे चार दुचाकी होत्या. ‘खाक्या’ दाखवून विचारपूस करताच या चारही मोटारसायकली आपण शहरातून चोरी केलेल्या आहेत, अशी या आरोपींनी कबुली दिली. सध्या आरोपी पोलीस कोठडीत असून त्यांच्याकडून वाहनचोरीचे आणखी अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.