शहरं
Join us  
Trending Stories
1
"ठाकरे बंधूंच्या ताकदीपुढे सरकारनं माघार घेतली; ही विजयाची पहिली पायरी, यापुढे..."
2
पुण्यातील लोणी काळभोरमध्ये लागले इराणचे झेंडे, खामेनींचे फ्लेक्स; Video व्हायरल...
3
बँका तुमचं काम करत नाहीयेत, टेन्शन कशाला? RBI नं दिलीये सुविधा; 'इकडे' करू शकता त्यांची तक्रार
4
Video:"...आता मला काय विचारताय तुम्ही"; एकनाथ शिंदे चंद्रशेखर बावनकुळेंवर का संतापले?
5
रतन टाटांनी करिअरची सुरुवात केलेल्या कंपनीला १००० कोटींची नोटीस! समोर आले धक्कादायक कारण
6
'मला न्याय हवा', खा. चंद्रशेखर यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करणाऱ्या तरुणीचे PM मोदींना पत्र
7
PF मधून पैसे काढायचेत? पहिले जाणून घ्या तुमच्या कंपनीनं केलंय की नाही 'हे' काम? नाहीतर क्लेम होईल रिजेक्ट
8
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
9
Job Alert: पाच अशा नोकऱ्या, ज्या येत्या काळात संपून जातील; वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा इशारा
10
कॅनरा बँकेतील सोन्यावर मारला डल्ला, ५३.२६ कोटींची चोरी; शाखा मॅनेजरच निघाला मुख्य सूत्रधार
11
नोकरीचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीची विक्री करून परस्पर लावले लग्न, पित्याने घेतला गळफास
12
"सत्यनारायण पूजेसाठी दिवसभर उपवास अन् नंतर...", शेफालीचा पती पराग त्यागीने दिली माहिती
13
विठ्ठल दर्शनाची आस अधुरीच राहिली; वारीतच २ वारकऱ्यांवर काळाचा घाला,  हरिनामाचा गजर शेवटचा ठरला
14
कधीही फसणार नाही! ‘या’ स्ट्रॅटजीनं कराल म्युच्युअल फंडात गुंतवणूक; बनू शकेल मोठा पैसा, अनेकांना माहितच नाही
15
शाळेत जायला रस्ताच नाही, कोणत्या 'भाषेत' सांगितल्यावर ही समस्या सुटेल? फांदीचा आधार घेत पार करतात नदी...
16
Share Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; ट्रेंट, इटर्नलमध्ये तेजी; एनटीपीसी, Reliance घसरले
17
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
18
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
19
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
20
Paresh Rawal : "आता सगळं ठीक झालंय...", परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'मध्ये कमबॅक; नक्की काय घडलं होतं?

सातारा परिसरात वाळूवरून टोळीयुद्ध

By admin | Updated: December 16, 2014 01:09 IST

औरंगाबाद : वाळू व्यवसायाच्या वादातून रविवारी रात्री सातारा परिसरात दोन वाळू व्यावसायिकांमध्ये तुंबळ हाणामारी झाली.

औरंगाबाद : वाळू व्यवसायाच्या वादातून रविवारी रात्री सातारा परिसरात दोन वाळू व्यावसायिकांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. विशेष म्हणजे यावेळी एका गटाचा वाळूचा ट्रकच पेटवून देण्यात आला. वेळीच पोलीस घटनास्थळी पोहोचल्यामुळे अनर्थ टळला. नंतर मात्र दोन्ही गटांनी एकमेकांविरुद्ध तक्रारी देणे टाळले. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पैठण आणि सातारा परिसरातील दोन वाळू व्यावसायिकांमध्ये काल वाळू उचलण्यावरून आणि देण्याघेण्यावरून वाद सुरू होता. रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास सातारा परिसरातील चाटे स्कूल रोडवर हे दोन्ही गट समोरासमोर आले. तेथे दोघांमध्ये पुन्हा चकमक उडाली. दोन्ही गटांत मग तुंबळ हाणामारी झाली. तोपर्यंत एका गटाने दुसऱ्या गटाचे तेथे उभे असलेले टिप्परच पेटवून दिले. या प्रकाराने नागरिकांमध्ये खळबळ उडाली.घटनेची माहिती मिळताच पोलीस फौजफाटा घटनास्थळी पोहोचला. लगेच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात येऊन ट्रकची आग विझविण्यात आली; परंतु तोपर्यंत ट्रक खाक झाला होता. या प्रकारानंतर पोलिसांनी दोन्ही गटांना ठाण्यात नेले. तेव्हा मात्र दोन्ही गटांनी तक्रार देण्यास टाळाटाळ सुरू केली.अखेर एका गटाने पैशाच्या देवाणघेवाणीवरून आपल्याला मारहाण झाल्याची तक्रार दिली, तर दुसऱ्या गटाने अज्ञात आरोपींनी आपला ट्रक जाळल्याची तक्रार दिली. घटनास्थळी वेळीच पोलीस आल्यामुळे मोठा अनर्थ टळला.