शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

गणेशाला सहस्त्रमोदकांचा नैवेद्य

By admin | Updated: September 12, 2014 23:51 IST

सार्वजनिक गणेशोत्सव : सावंतवाडीतील वैश्यवाडा उत्सव मंडळाचा उपक्रम

सावंतवाडी : शहरातील उभाबाजार व वैश्यवाडा येथे मोठ्या उत्साही वातावरणात सुरू असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवात संकष्टी चतुर्थीनिमित्त शुक्रवारी मोदक ‘श्रीं’ च्या चरणी अर्पण करण्यात आले. तत्पूर्वी पहाटे बहुसंख्य भाविकांच्या उपस्थितीत वैश्यवाडा येथे सामुदायिक अथर्वशीर्ष पठण करण्यात आले. उभाबाजार व वैश्यवाडा येथील श्री हनुमान मंदिर येथे २१ दिवसांचा सार्वजनिक गणेशोत्सव सुरू आहे. वेद पाठशाळेचे प्राचार्य दीक्षित गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली सूर्योदयाआधी सामुदायिक अथर्वशीर्ष पठणाचा कार्यक्रम झाला. यावेळी बहुसंख्य भाविक उपस्थित होते. यावेळी वैश्यवाडा येथे साईनाथ मिशाळ तर उभाबाजार येथे संजय मसूरकर यांना पूजेचा मान मिळाला. दुपारी १ वाजता महाआरती होऊन श्रींना सहस्त्र मोदकांचा नैवेद्य अर्पण करण्यात आले. यावेळी श्रींना मोदकांचा नैवेद्य देण्यासाठी खूप गर्दी झाली होती. यावेळी माजी आमदार दीपक केसरकर, माजी आमदार राजन तेली, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष काका कुडाळकर आदी उपस्थित होते. या गणेशोत्सवात रोज भजनादी कार्यक्रम सुरू आहेत. धोंडी दळवी, महादेव गावडे, अ‍ॅड. परिमल नाईक, शरद सुकी, विश्वनाथ नार्वेकर, म्हापसेकर बंधू, भाजी मार्केट मित्रमंडळ, शरद नार्वेकर यांच्यातर्फे भजनाचे कार्यक्रम होत आहेत. गणेश विसर्जनादिवशी डॉ. दादा केसरकर यांच्याकडून पंचखाद्य प्रसाद व श्रींना लघुरुद्र आनंद नेवगी यांच्याकडून केला जाणार आहे. तर उभाबाजार येथे बाल गोपाळ मित्रमंडळाचे अध्यक्ष रघुनाथ कोरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली बाळू कासार, अरूण भिसे, बंड्या कोरगावकर, प्रशांत वाळके, प्रतिक कोरगावकर, कुंदन टोपले, नित्यानंद कोरगावकर, प्रणव शिरोडकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)