शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

वाहन तपासावे की, विसर्जन करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 23:57 IST

वाहन तपासावे की, विसर्जन करावे, असा प्रश्न गणेश मंडळांसमोर उभा राहिला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : गणेश विसर्जन मिरवणुकीत नेण्यात येणारी वाहने तांत्रिक दृष्ट्या सक्षम असावीत, अशी सूचना आरटीओ कार्यालयाने केली आहे. त्यासाठी वाहनांची तपासणी करून घेणे बंधनकारक केले आहे; परंतु ग्रामीण भागातील वाहनांची गणेश विसर्जनाच्या दिवशीच ५ सप्टेंबरला ही तपासणी होणार आहे, त्यामुळे वाहन तपासावे की, विसर्जन करावे, असा प्रश्न गणेश मंडळांसमोर उभा राहिला आहे.जिल्ह्यात अडीच ते तीन हजार गणेश मंडळे आहेत. ५ सप्टेंबरला मोठ्या उत्साहात गणरायाला निरोप दिला जाणार आहे. विसर्जनानिमित्त शहराबरोबर ग्रामीण भागात मिरवणुका काढण्यात येतात. यामध्ये सहभागी होणारी वाहने नादुरुस्त, तांत्रिकदृष्ट्या सक्षम असावीत, यासाठी वाहनांची तपासणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी आरटीओ कार्यालयाने मोटार वाहन निरीक्षकांची नेमणूक केली आहे. गंगापूर, वैजापूर, पैठण, कन्नड, फुलंब्री, सिल्लोड, सोयगाव, खुलताबाद येथील पोलीस ठाण्यांत मंगळवारी सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत ही तपासणी केली जाणार आहे. तपासणीनंतर वाहनचालकांना वाहन सक्षम असल्याचे पत्र दिले जाईल; परंतु गणेश विसर्जनाच्या दिवशीच तपासणी करण्याची वेळ येत आहे, त्यामुळे वाहन तपासणी कधी करायची आणि कधी विसर्जन करायचे, असा प्रश्न गणेश मंडळांकडून विचारला जात आहे.आरटीओ कार्यालयात १ ते ५ सप्टेंबरदरम्यान या तपासणीची सुविधा देण्यात आली. त्यात आता शेवटचे दोन दिवस शिल्लक आहेत; परंतु ग्रामीण भागातून केवळ या तपासणीसाठी येणे परवडणारे नाही, त्यामुळे अनेकांनी या तपासणीकडे दुर्लक्ष केले आहे. ग्रामीण भागातही या कालावधीत तपासणी होणे आवश्यक होते; परंतु ग्रामीण भागात शेवटच्या दिवशी तपासणी होणार असल्याने वाहनांची गर्दी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.