शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

गणेश मंडळात जुगार अड्डा; आठ अटकेत

By admin | Updated: September 4, 2014 01:22 IST

जालना : शहरातील हनुमान घाट भागातील बजरंग गणेश मंडळात रात्री १.३० वाजेच्या सुमारास झन्ना-मन्ना नावाचा जुगार खेळणाऱ्यांना सदर बाजार पोलिसांच्या गस्ती पथकाने पकडले

जालना : शहरातील हनुमान घाट भागातील बजरंग गणेश मंडळात रात्री १.३० वाजेच्या सुमारास झन्ना-मन्ना नावाचा जुगार खेळणाऱ्यांना सदर बाजार पोलिसांच्या गस्ती पथकाने पकडले. यात आठ आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातून ४ हजार ६०७ रूपये जप्त करण्यात आले. सदर बाजार पोलिस ठाण्याचे पथक गणेशोत्सव काळात अप्रिय घटना घडू नये, यासाठी गस्तीवर होते. पोलिस निरीक्षक संतोष पाटील हे कन्हैय्यानगर भागातून राष्ट्रीय हिंदी विद्यालयाकडे येत असतांना गणेश मंडळासमोर दिव्याखाली जुगार खेळतांना काही जण दिसले. पाटील यांनी सहकाऱ्यांसह छापा मारून आरोपी रामेश्वर ममताजी शिंदे, योगेश रामेश्वर गवारे, दत्ता गणेश शिंदे, सतीश जनार्धन घोडके, प्रेमानंद छन्नू चौधरी, विष्णू दगडू साबळे, संतू दगडू साबळे यांना पकडण्यात आले. त्यांच्या विरोधात सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. फोनवरून बोलल्याने विवाहितेला मारहाण अहेर वाहेगाव (जि.बीड) सन्ना रईस चाऊस या विवाहितेला ‘तू नेहमी फोनवर बोलत असते,’ या कारणावरून रईस मिया चाऊस, सईद मिया चाऊस, कुरेशी चाऊस यांनी मारहाण करून घरातून हाकलून दिले. माहेराहून ४० हजार रूपये आण, असा दम दिला. ही घटना नुकतीच घडल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी सन्ना चाऊस या विवाहितेने गोंदी पोलिस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. जालना : जालना-औरंगाबाद मार्गावर बदनापूर येथील हॉटेल महाराजा समोर देवराव गाडेकर हे महामार्ग ओलांडत असतांना मोटारसायकल (एम.एच.२१ ऐ.जे. ८८३१) स्वाराने जोरदार धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी होऊन मरण पावले. हा प्रकार २ सप्टेंबर रोजी घडला. ४बदनापूर गावात घडलेल्या प्रकारानंतर मोटारसायकलस्वार पळून गेल्याचे दत्ता देवराव गाडेकर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी बदनापूर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास जमादार तांबे करीत आहेत. घटनेनंतर अपघातस्थळी बघ्यांची गर्दी झाली होती. त्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली.