शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
3
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
4
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
5
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
6
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
7
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
8
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
9
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
10
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
11
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
12
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
13
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
14
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
15
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
16
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
17
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
18
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
19
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
20
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?

चकमक प्रकरणाने तणाव !

By admin | Updated: December 16, 2014 01:06 IST

बीड : अनेक गुन्ह्यांमध्ये हवा असणाऱ्या शाम आठवले याचा गेवराई तालुक्यातील धोंडराई येथे रविवारी चकमकीत ठार झाल्यानंतर सोमवारी माळीवेस परिसरात तणावपूर्ण वातावरण पहायला मिळाले.

बीड : अनेक गुन्ह्यांमध्ये हवा असणाऱ्या शाम आठवले याचा गेवराई तालुक्यातील धोंडराई येथे रविवारी चकमकीत ठार झाल्यानंतर सोमवारी माळीवेस परिसरात तणावपूर्ण वातावरण पहायला मिळाले. दिवसभरात घडलेल्या नाट्यमयी घडमोडीमुळे पोलिसही सावध भुमिकेत होते. बीड शहरातील माळीवेस भागात शाम आठवले याचे घर आहे. या भागातील व्यापारी व दुकानदारांनी आपली दुकाने उघडली नव्हती. सकाळी सामाजिक व दलित कार्यकर्ते दाखल होत असल्यामुळे माळीवेस भागात एकच गर्दी पहावयास होती. काही वेळ वाहतूक कोंडीही होती. प्रेत ताब्यात घेण्यास नकारसदरील चकमकीची सीबीआय चौकशी करावी तसेच पोलीस निरीक्षक सी.डी. शेवगण व एपीआय देशपांडे यांना निलंबित करणार नाही तोपर्यंत आपण प्रेत ताब्यात घेणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. या प्रकरणात पोलिसांनी दिरंगाई केली तर कुटुंबियांसह आत्मदहन करू, असा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान, सामाजिक संघटनांनी जिल्हा पोलीस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांची सोमवारी दुपारी भेट घेऊन या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे. घाटीत इनकॅमेरा पोस्टमार्टमशाम आठवले यास औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात नेत असताना त्याचा वाटेतच मृत्यू झाला होता. तेथे गेल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. सोमवारी दुपारी फॉरेन्सीक लॅबच्या तीन व घाटी रुग्णालयातील दोन डॉक्टरांनी शवविच्छेदन केले. सायंकाळी सातच्या सुमारास त्याच्या कुटूंबियाच्या ताब्यात आठवलेचे शव देण्यात आले. पोस्टमॉर्टेम झाल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र कुटूंबियांना देण्यात आले आहे तर फॉरेन्सिक लॅबचा अहवाल आठ दिवसांनी देण्यात येणार आहे.एकाला इंदौर येथून अटकशाम आठवले याच्या साथीदारास इंदौर येथून तीन दिवसापुर्वीच अटक केली होती. बीड येथून बंदुका घेण्यासाठी त्यास पाठविण्यात येणार होते. तो मोठा गुन्हा करण्याच्या तयारी असल्याचे यावरुन स्पष्ट होते.श्रद्धा आठवलेच्या नावावर शाम आठवले याचा पुतण्या महेश आठवले याची पत्नी श्रद्धा आठवले हिच्या नावावर असलेल्या कारमध्ये तो जात होता. ही कार मुंबई येथील चेंबुर येथून खरेदी केली होती. कार खरेदी करताना श्रद्धा आठवले हिच्या नावचे कागदपत्रे देण्यात आली आहेत. गेवराईत गुन्हा दाखलपोलिसांवर गोळीबार व शासकीय कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात ३०७ व ३५३ प्रमाणे एपीआय देशपांडे यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल झाला असून दोन पिस्टल ताब्यात घेण्यात आली आहेत.पोलिस द्यायचे धमक्या!शाम आठवलेच्या पत्नीने माध्यमांपुढे आश्रू ढाळत भावनेला वाट मोकळी करुन दिली. त्या म्हणाल्या, एलसीबीचे शेवगण, सानप, सोनवणे, मुन्ना वाघ केंव्हाही घरी येऊन धमकावत. तुला कंबरेपासून तोडू... गोळ्या घालू...अशा टोकाच्या धमक्या देत. घरातील २० ते २५ मोबाईल, एक जॅकेट पोलिसांनी नेले, ते परत केले नाहीत. उलट तेच जॅकेट घालून परत चौकशीसाठी आले, असा आरोपही त्यांनी केला.सीबीआय चौकशी करा: पोटभरेशाम आठवले आरोपी होता;पण त्याला गोळ्या झाडून मारण्याची परवानगी पोलिसांना दिली कोणी? असा सवाल बहुजन विकास मोर्चाचे बाबूराव पोटभरे यांनी उपस्थित केला. हा प्रकार संशयास्पद असल्याचे सांगून सीबीआय चौकशीची मागणी त्यांनी केली. (प्रतिनिधी)नोटा, मोबाईलला भेदून गोळी थेट छातीतशाम आठवले याने पोलिसांवर दोन्ही हातात बंदुका घेऊन गोळीबार केला त्याला प्रत्युउत्तर देत एपीआय देशपांडे यांनी त्याच्यावर तीन गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी त्याला लागली. त्याला पोलीस कर्मचाऱ्यांनी तात्काळ गेवराई उप-जिल्हा रुग्णालयात नेले. त्याची पल्स कमी असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. उपचार चांगला मिळावा यासाठी त्याला औरंगाबाद येथे डॉक्टरांनी रेफर केले. मात्र त्याचा वाटेतच मृत्यू झाला. त्याला जवळुन गोळी झाडली असल्याचा त्याच्या कुटूंबियाचा दावा खोटा आहे. त्याच्या खिशातील नोटा व मोबाईल छेदुन गोळी लागली असल्याचे अधीक्षक रेड्डी म्हणाले. शामची बहीण अरूणा आठवले सोमवारी प्रसार माध्यमांशी बोलल्या. पोलिसांच्या म्हणण्यानुसार तो पळून जात होता. मात्र २२ डिसेंबर २०१३ रोजी त्याचा अ‍ॅक्सीडेन्ट झाला असल्याने त्याच्या पायात रॉड होता, असे त्यांनी सांगितले. मी स्वत: औरंगाबाद येथे जाऊन त्याचे शव पाहिले असून त्याच्या शरीरावर कोणत्याही ठिकाणी खरचटलेले नाही. हा सर्व प्रकार संशयास्पद असल्याचेही आठवले म्हणाल्या. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सी.डी. शेवगण यांच्याकडून कुटुंबियांना धमक्याही येत होत्या. शेवगण यांच्यासह इतर दोन ते तीन पोलीसांचाही त्याला त्रास होत होता. त्यामुळे या प्रकरणाची सीबीआय चौकशी करून पो.नि. शेवगण व एपीआय देशपांडे यांची नार्को टेस्ट करावी तसेच त्यांना निलंबित करावे, अशी मागणी त्यांनी केली. गेवराई पोलीस स्टेशनमध्ये महेश याला पकडून ठेवले असून त्याच्या ताब्यात शामचे प्रेत देण्यात येत असल्याचा पोलिसांचा दावा असल्याचेही त्या म्हणाल्या. काटकर लुटमार प्रकरणात शाम आठवले याचा सहभाग नव्हता. त्याला यात गोवण्यात शेवगण यांचा हात असल्याचेही त्या म्हणाल्या. गेवराई तालुक्यातील धोंडराई येथे शाम आठवले हा चकमकीतच ठार झाला आहे. या प्रकरणाच्या कोणत्याही चौकशीसाठी पोलीस प्रशासन तयार आहे. यात कोणताही गैरप्रकार झालेला नाही. तहसीलदार यांच्या उपस्थितीत पंचनामा झाला आहे. तसेच गेवराई येथे त्याच्यावर प्राथमिक उपचारही झालेले आहेत व नंतर औरंगाबाद येथे शवविच्छेदन करण्यात आले असल्याचे पोलीस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांनी सांगितले. गेवराई तालुक्यातील धोंडराई येथे पोलिस आणि आठवले यांच्यात दहा मिनिटे चकमक उडाली.