परंडा : स्मशानभूमीसाठी जागेची मागणी करूनही प्रशासानाकडून प्रतिसाद मिळत नसल्याने मातंग समाजातील नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करीत भरवस्तीतील बार्शी रोडवरील स्मशानभूमीत मयतावर अंत्यसंस्कार करावे लागत आहेत़ मुख्य मार्गावरून शाळेला ये-जा करणाऱ्या लहान विद्यार्थ्यांमध्ये यामुळे दहशत निर्माण होत असून, प्रशासनाचे असहकार्य लाभत असल्याने मातंग समाजातूनही संताप व्यक्त होत आहे़शहरातील बार्शी रोडवरीलील सततची वर्दळ, समोर पोलिस ठाणे, पाठीमागे व्यापारी संकुल तर शेजारी परंडा न्यायाधिशाचे निवासस्थान अशा चारही बाजूंच्या वस्तीत मातंग स्मशानभूमी अडकली आहे़ मातंग समाजाची स्मशानभूमी १९ व्या शतकातली गावकुसाबाहेर होती़ मात्र, शहराचे विस्तारीकरण झाल्याने ही स्मशानभूमी मुख्य चौकातच आहे. नजीकच व्यापारी संकुल असून, येथे येणाऱ्या महिलांसह नागरिकांचीही अंत्यविधी सुरू असताना अडचण होत आहे. या स्मशानभूमीस तारेचे कुंपन नाही, संरक्षक भिंतही नाही़ त्यामुळे उघड्यावरच समाजातील मयत इसमावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे़ एखाद्यावर अंत्यसंस्कार होत असताना शाळेत ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्येही यामुळे भितीचे वातावरण आहे़ या अडचणी पाहता १९९० साली समाजाच्या वतीने एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेवून शहराबाहेर स्मशानभूमीसाठी जागा देण्याची मागणी केली होती़ त्यानंतर तहसील कार्यालयामार्फत यासाठी पाठपुरावा करण्यात आला़ मात्र, अद्यापही प्रशासनाने याकडे लक्ष दिलेले नसल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे़ (वार्ताहर)४स्मशानभूमीसाठी शहराबाहेर जागा उपलब्ध करुन देण्यासंबंधी गेल्या २४ वर्षापूर्वीपासून समाजाकडून पाठपुरावा सुरू आहे़ मात्र प्रशासनाने अद्यापपर्यंत जागा उपलब्ध करुन दिलेली नाही. पर्यायी जागा नसल्याने नाईलाजाने आहे त्या ठिकाणी दफनविधीसह इतर विधी उरकावे लागत असल्याचे नवनाथ कसबे यांनी सांगितले.पालिकेशी चर्चा करू४नगरपालिका स्तरावर आरक्षणाच्या माध्यमातून जागेची उपलब्धता आहे का याची तपासणी करण्यासंबंधी पालिका प्रशासनाशी चर्चा केली जाईल. जागा उपलब्ध असेल तर हा प्रश्न निकाली काढला जाईल. यातूनही पुढे पर्यायी जागा उपलब्ध करण्यासंबंधी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा केला जाईल, असे तहसीलदार स्वरुप कंकाळ यांनी सांगितले.
भरवस्तीत केले जातात अंत्यसंस्कार
By admin | Updated: December 22, 2014 23:53 IST