राज्य शासनाच्या पर्यावरण विभागाकडून ऑक्टोबर २०२० मध्ये ‘माझी वसुंधरा अभियान’ सुरू करण्यात आले. हे अभियान दोन टप्प्यात राबविण्यात आले. या कालावधीत केलेल्या कामांचे मूल्यांकन राज्य शासनाने नेमलेल्या त्रयस्थ संस्थेमार्फत करण्यात आले. यामध्ये पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या निसर्गातील पंचतत्त्वांना अनुसरून कामाची विभागणी केली गेली होती. मात्र, कोरोना महामारीमुळे लागू असलेल्या निर्बंधांमुळे अभियान कालावधीत केलेल्या कामांची प्रत्यक्ष पाहणी करणे शक्य झाले नाही. त्यामुळे शासनातर्फे नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीने पहिल्या दहा शहरांची दृक्श्राव्य पद्धतीने ऑनलाइन सादरीकरण पाहून तसेच व्हिडिओद्वारा पाहणी करून कामांचे अंतिम मूल्यांकन केले. यामध्ये फुलंब्री नगर पंचायतचे काम उल्लेखनीय आढळून आल्यामुळे या न.पं.ने ६३१ गुण मिळवून राज्यात सातवा तर मराठवाड्यात पहिला क्रमांक मिळविला आहे.
कोट
राज्यभरातील १३२ नगर पंचायतने यात सहभाग नोंदविला होता. कोरोना महामारीमध्ये शासनाने ठरवून दिलेल्या नियम व अटीमध्ये पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या दिलेल्या पाच विषयांनुसार काम करून शासनाच्या धोरणावर खरे उतरण्याचा प्रयत्न केला. यात फुलंब्री नगर पंचायत मराठवाड्यात प्रथम आली आहे.
-सुहास सिरसाठ, नगराध्यक्ष, फुलंब्री नगर पंचायत.
फोटो : आहे.