शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

आघाडीचे संकेत; आता चर्चा जागा वाटपावर

By admin | Updated: January 17, 2017 00:29 IST

लातूर : राज्याचे ठरेल तेव्हा ठरेल, मात्र लातूर जिल्ह्यापुरते का होईना आपण एकत्र येऊन आघाडीनेच लढण्याचे ठरवूयात, असे संकेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आज संयुक्त बैठकीत दिले आहेत.

लातूर : राज्याचे ठरेल तेव्हा ठरेल, मात्र लातूर जिल्ह्यापुरते का होईना आपण एकत्र येऊन आघाडीनेच लढण्याचे ठरवूयात, असे संकेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आज संयुक्त बैठकीत दिले आहेत. जागावाटपावर आघाडीचे घोडे अडले असून येत्या दोन दिवसात यावर चर्चा झाल्यानंतरच अंतिम घोषणा होणार आहे. जागावाटपाच्या मुद्यावर एकमत झाल्यास ही आघाडी होणार की फिस्कटणार याकडे डोळे लागले आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा सवता सुभा राज्यभर चालू आहे. मात्र भाजपाचा वारु रोखण्यासाठी जिल्ह्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते एकत्र येऊन आघाडीसाठी पुढाकार घेत असल्याचे लातुरातील चित्र आहे. सुरुवातीला जिल्हा बँक आणि आता आ. दिलीपराव देशमुख यांच्या ‘आशियाना’वर दोन्ही पक्षांच्या नेत्यांत दीर्घ बैठक रंगली. या बैठकीला स्वत: आ. देशमुख यांच्यासह काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. व्यंकट बेद्रे, काँग्रेसचे शहराध्यक्ष मोईज शेख, रेणाचे चेअरमन आबासाहेब पाटील, मांजराचे उपाध्यक्ष श्रीशैल उटगे, राष्ट्रवादीचे पक्ष निरीक्षक जीवनराव गोरे, राकाँ जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील, शहर जिल्हाध्यक्ष मकरंद सावे, संजय बनसोडे, बबन भोसले, प्रशांत पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली यावर दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी मौन राखले. मात्र आघाडी करुनच लढायचे संकेत असून जागावाटपानंतरच अधिकृतपणे जाहीर करण्याचे ठरल्याचे नाव न छापण्याच्या अटीवर एका सूत्राने सांगितले.