शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
5
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
6
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
7
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
8
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
9
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
10
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
11
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
12
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
13
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
14
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
15
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
16
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
17
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
18
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
19
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी समन्वय समितीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 00:58 IST

विविध मागण्यांसाठी शेतकरी समन्वय समितीच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी संघर्ष मोर्चा काढण्यात आला

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : विविध मागण्यांसाठी शेतकरी समन्वय समितीच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी संघर्ष मोर्चा काढण्यात आला.जुना जालना भागातील गांधीचमन येथील महात्मा गांधी यांच्या पुतळयाला अभिवादन करून मोर्चास प्रारंभ झाला. शासनाच्या उदासीन धोरणामुळे शेतकºयांना आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. शेतकºयांच्या पिकाला हमी भाव नसल्याने कवडीमोल दरात शेतमालाची विक्री करण्याची वेळ आली आहे.आधीच दुष्काळाची दाहकता सोसत असलेल्या जिल्ह्यातील शेतकºयांना शासनाकडून कुठलाच दिलासा मिळत नसल्याने शेतकºयांत संताप आहे. कर्ज काढून शेतकºयांना शेती करावी लागत आहे. आणि त्यातच निघालेल्या मालाला बाजारात योग्य भावच नसल्याने शेतकºयांनी काय करावे, असा प्रश्न शेतकºयांनी केला. यामुळे शेतकरी आत्महत्येचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, याकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याने शेतकºयांनी निषेध व्यक्त केला.शेतकºयांना बिनशर्त संपूर्ण कर्जमाफी द्यावी, शेतकºयांच्या शेतमालाला हमी देण्यात यावा, २०१६-१७ खरीप हंगामात झालेल्या पिकाच्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई देण्यात यावी, जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा, वीज पुरवठा सुरळीत करावा, शेतकºयांना वीजबिल माफ करावे, खडकपूर्णा धरणातील पाणी सिंचनासाठी सोडावे, २०१६-१७ चा पीकविमा मंजूर करण्यात यावा, शेतकºयांना १०० टक्के अनुदानावर शेततळ्यासाठी प्लास्टीक पन्नी देण्यात यावी, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यात करा, ५५ वर्षे वयाच्या शेतकºयांना पेन्शन देण्यात यावे, आणि समृध्दी महामार्गात ज्या शेतकºयांच्या जमिनी गेल्या त्यांना ५० वर्षांचे उत्पन्न गृहीत धरून मोबदला देण्यात यावा, बाधित शेतकºयांचे पुनर्वसन करून त्यांच्या कुटुंबातील सदस्यास शासकीय नोकरी देण्यात यावी आदी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांना देण्यात आले.या मोर्चात तालुक्यातील वरूड नाव्हा, पिरकल्याण, वडगाव, वखारी, पत्रातांडा, नंदापूर, कडवंची, पानशेंद्रा, धारकल्याण, बोरखेडी, देवमूर्ती, सोमनाथ जळगाव, भिलपुरी, ब्राह्मणखेडा, आनंदवाडी, धावेडी, थार, अहंकार देऊळगाव, अंभोरेवाडी आदी गावांतील शेतकºयांनी मोर्चात सहभाग होता.