शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मोफत टँकरचे धोरण मनपाने केले बंद

By admin | Updated: September 20, 2014 00:27 IST

औरंगाबाद : शहर व गुंठेवारी वसाहतींमध्ये १ सप्टेंबरपासून औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीने पाणीपुरवठा सुरू केला आहे. मोफत टँकर बंद आहेत.

औरंगाबाद : शहर व गुंठेवारी वसाहतींमध्ये १ सप्टेंबरपासून औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीने पाणीपुरवठा सुरू केला आहे. २० दिवसांपासून मोफत देण्यात येणारे टँकर कंपनीने बंद केल्यामुळे नागरिक आंदोलन करीत आहेत. आज टँकरने पाणीपुरवठा करण्याच्या मागणीसाठी मिलिंदनगर भागातील हिराबाई जाधव यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी लाक्षणिक उपोषण केले. १५ दिवसांपासून टँकर येत नसल्याची तक्रार उपोषणकर्त्यांनी केली. उपजिल्हाप्रमुख नंदकुमार घोडेले, प्रकाश जावळे यांनी मध्यस्थी करून उपोषण सोडले. वसाहतींचे पत्ते, मार्ग आणि टँकर पाठविण्याच्या वेळा माहीत नसल्यामुळे कंपनीने नेमलेले टँकर वेळेत जात नसल्याची ओरड सुरू आहे. पालिकेच्या टँकरचे काय झाले, गुंठेवारी वसाहतींसाठी स्वतंत्र सेल सुरू केला आहे काय, याबाबत पालिकेतून आणि कंपनीकडून कुणीही माहिती देण्यास तयार नाही. गुंठेवारी वसाहतींत आणि मोफत टँकरने पाणीपुरवठा करण्याचे धोरण कंपनीने अजून तरी ठरविलेले नाही.टँकर महागणार काय, कंपनी वेळेत पाणीपुरवठा करणार की नाही, यासारखे अनेक प्रश्न नागरिकांना भेडसावत आहेत. रोज ३० वसाहतींना ३ एमएलडी म्हणजेच ३० लाख लिटर पाणीपुरवठा टँकरने होतो. ३० वॉर्डांतील सुमारे ५० हजार नागरिक टँकरचे पाणी पितात. एक टँकर ८ फेऱ्या मारीत असल्याची नोंद मनपा दप्तरी आहे.शहरातील सुमारे ५० हजार नागरिक टँकरवरून पिण्याचे पाणी भरतात. प्रभाग ‘अ’ व ‘ड’ मधील पडेगाव, मिटमिटा, पेठेनगर, खुशबू कॉलनी, पहाडसिंगपुरा, हर्सूल, हिमायतबाग या भागांत टँकरने पाणीपुरवठा होतो. प्रभाग ‘ब’ व ‘क’ मधील मिसारवाडी, जाधववाडी, म्हसोबानगर, भगतसिंगनगर, केशरदीप, छत्रपतीनगर, माऊलीनगरमध्ये, तर प्रभाग ‘ई’ व ‘फ’ मधील जयभवानीनगर, गुरुदत्तनगर, रामनगर, रेणुकानगर, आनंदनगर, अबरार कॉलनी, महूनगर, गणेशनगर, हनुमानगर, संतोषीमातानगर, गारखेडा परिसरात टँकरने पाणीपुरवठा होतो.