शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
2
बाईकवरून आले अन् डोक्यातच घातल्या गोळ्या; प्रसिद्ध उद्योगपतीच्या हत्येनं परिसरात खळबळ
3
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?
4
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
6
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
7
अमेरिकन कंपनीचा शेअर बाजारात घोटाळा, जेन स्ट्रीट या ट्रेडिंग कंपनीने हेराफेरी करत मिळवला ३६,६७१ कोटींचा नफा; सेबीने कारवाई करत घातली थेट बंदी
8
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
9
८०% ‘जेन झी’ला करायचंय ‘एआय’शी लग्न, एआय पार्टनर्स आता मानवी नात्यांची जागा घेईल
10
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
11
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
12
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
13
मतदान केंद्र निश्चितीचे निवडणूक आयोगाचे आदेश; राजकीय पक्षांच्या बैठका घेण्याचीही अधिकाऱ्यांना सूचना
14
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी
15
वाहतूकदारांचा संप मागे; ८० टक्के मागण्या मान्य, ई-चलानचा दंड तसेच ९० दिवसांपेक्षा जास्त जुने चलानही रद्द
16
उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची पदे भरण्यास सर्वोच्च न्यायालय प्रयत्नशील : सरन्यायाधीश गवई
17
कांदळवनांचा अडथळा; पुनर्विचार याचिका करणार, वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती; सर्वेक्षणातून समजणार अचूक क्षेत्रफळ
18
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
19
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...

महावीर चौक उड्डाणपुलाचा मार्ग मोकळा; विरोधातील याचिका फेटाळली

By admin | Updated: September 16, 2014 01:37 IST

औरंगाबाद : रेल्वेस्टेशन ते मध्यवर्ती बसस्थानक रोडवरील महावीर चौकात दक्षिणोत्तर उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय सकल विचार करूनच घेण्यात आला आहे,

औरंगाबाद : रेल्वेस्टेशन ते मध्यवर्ती बसस्थानक रोडवरील महावीर चौकात दक्षिणोत्तर उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय सकल विचार करूनच घेण्यात आला आहे, असे नमूद करून दक्षिणोत्तर उड्डाणपूल उभारणीस विरोध करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने सोमवारी फेटाळली.महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून महावीर चौक येथे पूल उभारण्यात येत आहे. दक्षिणोत्तर उड्डाणपूल उभारण्यास आव्हान देणारी जनहित याचिका औरंगाबाद बस ओनर्स अँड टॅ्रव्हल एजंट असोसिएशन आणि इतर १४ जणांनी अ‍ॅड. सतीश तळेकर यांच्यामार्फत औरंगाबाद खंडपीठात दाखल केली होती. याचिकेत नमूद केले होते की, पूल दक्षिण-उत्तर उभारणे जनहितविरोधी आहे. तो पूर्व-पश्चिम असा आवश्यक आहे.केवळ संरक्षण विभागाकडून जमीन उपलब्ध होणार नाही, या कारणासाठी हा पूल पूर्व-पश्चिम असा टाळण्यात आला आहे. शिवाय रस्ते विकास महामंडळाने या उड्डाणपुलाकरिता संरक्षण विभागाकडे रीतसर जागेची मागणी केली नाही. वाहतूक शाखेच्या सहायक आयुक्तांनी महावीर चौकातील उड्डाणपूल दक्षिणोत्तर असा उभारणे अयोग्य असल्याचा अभिप्राय दिलेला आहे. जालना रोडवरील वाहतूक, अहमदनगर, नाशिककडून येणारी वाहने आणि प्रवाशांची संख्या ही दक्षिणोत्तर वाहन संख्येपेक्षा पाचपट अधिक असल्याचे नमूद केले होते. त्यामुळे उड्डाणपूल पूर्व-पश्चिम असाच उभारावा, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती. याचिकेवर सुनावणी झाली असता रस्ते विकास महामंडळातर्फे अ‍ॅड. एस. व्ही. अदवंत यांनी न्यायालयास सांगितले की, शहराच्या दक्षिणेकडील भागात होऊ घातलेल्या दिल्ली- मुंबई इंडस्ट्रीयल वसाहतीमुळे (डीएमआयसी) दक्षिणोत्तर वाहनांची संख्या वाढणार आहे. पैठण लिंक रोडमुळे नगर, नाशिककडून येणाऱ्या वाहनांना पर्याय मिळाला आहे. जालना रोडकडून जाणारी वाहतूकही झाल्टा फाट्यापासून बीड बायपासने जाते. परिणामी जालना रोडवरील वाहतुकीचा भार कमी झाला.शिवाय इंडियन रोड काँग्रेसच्या नियमानुसार उड्डाणपुलाची उंची साडेपंधरा मीटर ठेवण्यात येत असून, पुलाखाली दोन्ही बाजूंनी ५० फुटांची जागा सोडण्यात आली आहे. संरक्षण विभागाकडून जागा मिळण्यासंदर्भात आधीचा अनुभव लक्षात घेता पुलाचे काम जलदगतीने होण्यासाठी दक्षिणोत्तर पूल उभारणीचा निर्णय सकल विचार करून घेण्यात आल्याचे शपथेवर सांगितले. यावेळी पुलाचे काम करणाऱ्या सत्यसाईबाबा कन्स्ट्रक्शनतर्फे अ‍ॅड. प्रदीप देशमुख यांनी पुलाच्या बांधकामाच्या प्रगतीची माहिती शपथपत्राद्वारे दिली. उभय पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायमूर्ती ए. व्ही. निरगुडे आणि न्यायमूर्ती ए. आय. एस. चिमा यांनी महावीर चौकात दक्षिणोत्तर उड्डाणपुलास आव्हान देणारी याचिका फेटाळली.शहराच्या दक्षिणेकडील भागात होऊ घातलेल्या दिल्ली- मुंबई इंडस्ट्रीयल वसाहतीमुळे (डीएमआयसी) दक्षिणोत्तर वाहनांची संख्या वाढणार आहे. पैठण लिंक रोडमुळे नगर, नाशिककडून येणाऱ्या वाहनांना पर्याय मिळाला आहे. जालना रोडकडून जाणारी वाहतूकही झाल्टा फाट्यापासून बीड बायपासने जाते. परिणामी जालना रोडवरील वाहतुकीचा भार कमी झाला.