शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

दिवसाला ६ टक्के व्याजाला भुलले शेकडो कर्मचारी; दोन्ही अॅप पडले बंद, लाखों रुपये अडकले

By राम शिनगारे | Updated: March 18, 2024 19:20 IST

छप्पर फाड के... ५०० रुपयांचे ९० दिवसांत चक्क ९४,७३२ रुपये कमाईचे आमिष

छत्रपती संभाजीनगर : 'एआरएनएक्स' व 'एलएमएएक्स' नावाच्या ॲपमध्ये ५०० रुपयांची गुतवणूक केल्यानंतर त्याच दिवशी ३० रुपये, दुसऱ्या दिवशी ५६२, तिसऱ्या दिवशी ५९६ रुपये अशी ‘दिन दुगनी व रात चौगुणी’ वाढ मिळत होती. म्हणजेच प्रतिदिन प्रति शेकडा तब्बल ६ टक्के व्याज मिळत होते. या आमिषाला बळी पडत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील १५० ते २०० कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली. दोन महिन्यांतच हे दोन्ही ॲप बंद पडले असून गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याची माहिती समोर आली.

मागील १५ दिवसांपासून दाेन्ही ॲप सुरू होत नाहीत. बदनामीच्या भीतीपोटी तक्रार देण्यास कोणताही कर्मचारी पुढे येत नसल्याची माहिती विद्यापीठातील एका अधिकाऱ्याने 'लोकमत'शी बोलताना दिली. टेलिग्राम या सोशल मीडियात 'एआरएनएक्स' व 'एलएमएएक्स' या दोन ॲपविषयी माहिती मिळाली होती. त्यानुसार विद्यापीठातील एका अधिकाऱ्याने 'एलएमएएक्स' (एलमॅक्स) या ॲपवर सुरुवातीला ५०० रुपयांपासून गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. एका व्यक्तीने पाच व्यक्ती जोडल्यास जोडणाऱ्या व्यक्तीलाही प्रतिदिन ६०० रुपये मिळतील, असे टेलिग्राम सोशल मीडियातील ग्रुपवर नमूद होते. त्यानुसार विद्यापीठातील कर्मचारी, कंत्राटी कर्मचाऱ्यांमध्ये काही दिवसांत हे ॲप तोंडोतोंडी झाले. अनेकांनी स्वत:सह पत्नीच्या मोबाइलमध्येही दोन्ही ॲप डाऊनलोड करीत गुंतवणूक केली. अनेकांनी नातेवाइकांनाही गुंतवणूक करण्यास भाग पाडले. विशेष म्हणजे एलमॅक्स ॲपमध्ये पाचशे, हजार, पाच हजार, दहा हजार या पटीत गुंतवणूक करता येत होती. 'एआरएनएक्स' ॲपवर मात्र ५ हजार रुपयांपासून पुढेच गुंतवणूक करण्याची मुभा होती. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये एलमॅक्स ॲपचाच सर्वाधिक वापर झाल्याचेही अधिकाऱ्याने सांगितले.

एवढे मिळणार होते ९० दिवसांनी पैसेगुंतवूणक केल्यानंतर ९० दिवसांनी किती पैसे मिळतील याचे चार्टही पुरविण्यात आले होते. ५०० रुपये गुंतवल्यास त्यात प्रत्येक दिवशी ६ टक्के वाढ होऊन ९० दिवसांनी ९४ हजार ७३२ रुपये, १ हजार रुपयांस १ लाख ८९ हजार ४६५ रुपये, २ हजार रुपयांस ३ लाख ७८ हजार ९२९ रुपये, ३ हजार रुपयांस ५ लाख ६८ हजार ३९४ रुपये, ५ हजार रुपयांस ९ लाख ४७ हजार ३२३ रुपये आणि १० हजार रुपयांस १८ लाख ९४ हजार ६४५ रुपये ९० दिवसांनी मिळणार असल्याचेही आमिष दाखविण्यात आले होते.

टेलिग्रामवर फसवणूकीचे मायाजालटेलिग्राम सारख्या सोशल मीडियात अशा पद्धतीने फसवणूक करणारे शेकडो प्रोग्राम आहेत. त्यात कुठे गुंंतवणूक केली जाते, त्याविषयी काहीही माहिती मिळत नाही. देश-विदेशात या फसवणुकीच्या लिंकचे कनेक्शन निघू शकते. त्यामुळे नागरिकांनी अशा पद्धतीच्या प्रलोभनांना बळी पडू नये. फसवणूक झालेली असेल तर १९३० क्रमांकावर तक्रार नोंदवावी. तसेच, निर्भीडपणे सायबर पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन सायबरतज्ज्ञ तथा सहायक पोलिस निरीक्षक अमोल सातोदकर यांनी केले.

भूलथापांना बळी पडू नकानागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या भूलथापांना बळी पडू नये. आपण कोठेही गुंतवणूक करणार असाल तर संबंधित संस्था, फर्म ही नोंदणीकृत आहे का, याची माहिती घेऊनच केली पाहिजे.- गजानन कल्याणकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सायबर ठाणे, आयुक्तालय

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादDr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद