शहरं
Join us  
Trending Stories
1
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
2
Rashi Bhavishya: स्त्रीमुळे अडचणीत याल, अपघाताचीही शक्यता; आज 'या' राशीच्या लोकांनी काळजी घेणं आवश्यक
3
Election 2025: प्रभाग रचनेचा प्रस्ताव देणार आता निवडणूक आयोगाला, सरकारचा सुधारित आदेश
4
खोटे जात प्रमाणपत्र ही घटनात्मक फसवणूक, सरपंचाला हायकोर्टाने ठोठावला ५ लाखांचा दंड
5
भारताला तेलाची नाही चिंता; मित्र येतो कामी! इराणकडून आयात शून्य, पण...
6
पहिलीपासून तिसरी भाषा हिंदीचा निर्णय रद्द करा; मराठी भाषक अभ्यासकांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
7
MSRTC: एसटी गेली 'खड्ड्यात'; ३७ वर्षे तोट्याचा प्रवास, एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर
8
रतन टाटा यांचे उरलेले शेअर्स 'त्या' दोन संस्थांनाच; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
9
अग्रलेख: युद्ध थांबेल की अधिक पेटेल? परिणाम लवकरच जाणवू शकतात 
10
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
11
विशेष लेख: शेतकऱ्याला AI चार जास्तीचे पैसे मिळवून देईल?
12
स्पर्धा परीक्षेप्रमाणे सरळसेवा भरती परीक्षेसाठीही 'पर्सेटाइल' पद्धत; 'क' गट नोकर भरतीसाठी एमपीएससीचा निर्णय
13
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
14
लेख: गोव्यात चालणाऱ्या पार्ट्यांची 'धुंदी' वाढतेच आहे, कारण...
15
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
16
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
17
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
19
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
20
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार

बनावट कागदपत्रांच्या आधारे भूखंड विकून साडेआठ लाखांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:04 IST

औरंगाबाद : अस्तित्वात नसलेल्या भूखंडाचे बनावट कागदपत्रांच्या आधारे नोंदणीकृत खरेदीखत करून देत भूमाफियाच्या टोळीने एकाची आठ लाख ४० हजारांची ...

औरंगाबाद : अस्तित्वात नसलेल्या भूखंडाचे बनावट कागदपत्रांच्या आधारे नोंदणीकृत खरेदीखत करून देत भूमाफियाच्या टोळीने एकाची आठ लाख ४० हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला. याप्रकरणी तक्रार प्राप्त झाल्यानंतर गुन्हे शाखेने चौकशी करून गुरुवारी आरोपीविरुद्ध सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला.

नदीम हसन शेख (रा. जयसिंगपुरा), एजंट नदीम इब्राहिम शेख (रा. रोशन गेट) आणि बादशाह ऊर्फ अय्याज खान बाबूखान (रा. बायजीपुरा) अशी गुन्हा नोंद झालेल्या आरोपींची नावे आहेत.

तक्रारदार दत्तात्रय सुधाकर गायके (रा. मारोतीनगर) यांना बायजीपुरा येथील घर विकायचे होते. घराच्या बदल्यात प्लॉट देण्याची तयारी आरोपींनी दर्शविली. आरोपींनी गायके यांना बाळापूर शिवारातील एक हजार ५०० चौ. फू. क्षेत्रफळाचा आठ लाख ४० हजार रुपये किमतीचा भूखंड दाखविला. तक्रारदार यांच्या घराची किमत नऊ लाख रुपये निश्चित केली. यानंतर आरोपींनी तक्रारदार यांना तो भूखंड नावे करून दिला आणि तक्रारदाराकडून त्यांचे घर सिरसाट नावाच्या व्यक्तीच्या नावे करून घेतले. सिरसाटने हे घर लगेच दुसऱ्या एका व्यक्तीला आणि त्यांनी तिसऱ्याला विक्री केले. यानंतर बाळापूर सज्जाचे तलाठी शेळके यांनी तक्रारदार यांच्या रजिस्ट्री पेपरच्या आधारे त्या भूखंडाची फेर नोंदवहीत नोंद केली. यानंतर त्यांना त्यांचा सातबारा देण्यात आला. दरम्यान, ते भूखंडाचा ताबा घेण्यासाठी गेले असता त्यांच्या भूखंडावर दुसऱ्याच व्यक्तीने हक्क सांगितला. त्याच्याकडेही सातबारा असल्याचे दिसले.

चौकट

दुसरा वादग्रस्त भूखंड देण्याची तयारी

फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तक्रारदाराने आरोपींची भेट घेतली तेव्हा आरोपींनी दुसरा भूखंड देण्याची तयारी दर्शविली. आरोपींनी दाखवलेले भूखंड वादग्रस्त असल्याचे समजल्याने त्यांनी त्यांचे घर परत करण्यास सांगितले. मात्र तोपर्यंत ते घर तिसऱ्याच व्यक्तीने खरेदी केल्याचे त्यांना समजले. आरोपींनी पैसेही परत केले नाहीत. यामुळे त्यांनी पोलिसांत तक्रार नोंदविली.

=