शहरं
Join us  
Trending Stories
1
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
2
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
3
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
4
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
5
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
6
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
7
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
8
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
9
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
10
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
11
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
12
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
13
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
14
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)
15
Sonam Raghuvanshi : राजाच्या चेहऱ्यावर हसू अन् सोनमच्या डोक्यात हत्येचं प्लॅनिंग? लग्नातला 'तो' Video तुफान व्हायरल
16
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
17
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
18
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
19
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 

चार दिवसांचा संसार करून फसविणारी नवरी गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 23:04 IST

लग्नानंतर चारच दिवसांनी माहेरी जाते म्हणून गेलेली नवरी शोधाशोध करुनही मिळाली नाही. त्यामुळे पोलिसात तक्रार दिल्यानंतर या नवरीला व तिच्या सहका-याला पेठबीड पोलिसांनी ताब्यात घेतले

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : लग्नानंतर चारच दिवसांनी माहेरी जाते म्हणून गेलेली नवरी शोधाशोध करुनही मिळाली नाही. त्यामुळे पोलिसात तक्रार दिल्यानंतर या नवरीला व तिच्या सहका-याला पेठबीड पोलिसांनी ताब्यात घेतले. वधू-वर सूचक मंडळाच्या माध्यमातून लग्न जुळवून नंतर फसवणूक करणारे रॅकेट या प्रकरणामुळे उघडकीस येण्याची शक्यता आहे.शिरुर कासार येथील लक्ष्मण विठ्ठल गाडेकर यांनी जालना जिल्ह्यात बदनापूर तालुक्यातील कंडारी येथील वधू-वर सूचक मंडळाचे कासाजी यमाजी खाडे यांच्याकडे वधू संशोधनासाठी नोंद केली होती. त्यानुसार खाडे यांनी लक्ष्मण यांना परभणी येथील पूजा नामक मुलीचे स्थळ दाखविले. यावेळी अवधूत कुंडलिक जाधव, उत्तम केशव शिंदे [दोघेही रा. परभणी] यांनी मदत केली. मुलगी पसंत पडल्यानंतर १ डिसेंबर २०१६ रोजी कनकालेश्वर मंदिर परिसरात मोजक्या लोकांच्या उपस्थितीत लग्न झाले. लग्नानंतर पूजा सासरी गेली. मात्र, चार दिवसांनी माहेरी जाण्याची इच्छा व्यक्त केली. लक्ष्मण तिला जुना पडेगाव रस्ता भागात सोडून आला. मात्र, त्यानंतर पूजाचा फोन स्वीच आॅफ राहिला. लग्नासाठी लक्ष्मणने ३५ हजार रुपयांचे मंगळसूत्र, तसेच कपडे खरेदी केले होते. हे साहित्य घेऊन पूजा पसार झाली. सुरुवातीला लक्ष्मणला पोलिसांनी दाद दिली नाही. त्यामुळे न्यायालयात जावे लागले. २१ एप्रिल रोजी न्यायालयाच्या आदेशानुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. अखेर पूजा आणि अवधूत जाधव यांना जमादार खाडे व इतर कर्मचा-यांनी परभणी येथून चौकशीसाठी आणले. त्यानंतर सोमवारी सायंकाळी अटक केली. अधिक तपास जमादार खाडे हे करीत आहेत.